पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या *प्रभाग* *क्रमांक,३०* *फुगेवाडी, येथील दुर्घटना ग्रस्त कुटुबाला पिंपरी युवासेनेकडुन आथिर्क मदत

संवाददाता,सौ.पार्वती ढोणे, महाराष्ट्र राज्य प्रभारी.
दिनांक,३०.९.२०२१.
पिंपरी फुगेवाडी येथील दुर्घटना ग्रस्त मडके कुटुंबाला आपला संसार नव्याने उभा करण्यासाठी पिंपरी युवासेने तर्फे युवासेना प्रमुख पर्यावरण मंत्री मा.आदित्य ठाकरे, यांच्या हस्ते मदतीचा धनादेश मडके, कुटुंबाला सुपुर्द करण्यात आला तीन तासांच्या प्रयत्नातून कु.पोर्णिमा
मडके, हिला सुखरूप बाहेर काढण्याचं यश आले, परंतु मध्यमवर्गीय असलेल्या मडके कुटुंबावर एक प्रकारे संकटच कोसळले हातांवर पोट असलेल्या कुटुंबाचे राहते घर क्षणातच नाहिसे झाले, घरात पोर्णिमाचे वडील एकटेच कमवते आहेत शिपायांची नोकरी त्यातच उदरनिर्वाहासह कुटुंब सावरणे व नवीन घर बांधणे अवघड आहे तरी सदर कुटुंबाचा गांभीर्याने विचार करत मडके, कुटुंबाला आपला संसार नव्याने उभा करण्यासाठी पिंपरी युवासेने तर्फे युवासेना प्रमुख पर्यावरण मंत्री श्री. आदित्य ठाकरे, ह्यांच्या हस्ते मदतीचा धनादेश मडके कुटुंबाला सुपुर्द करण्यात आला.