मराठी

पुण्यातील ससून हॉस्पिटल मध्ये मोक्काच्या गुन्ह्यातील आरोपी अ‍ॅड दिप्ती काळेची आत्महत्या

संवाददाता तानाजी केदारी, महाराष्ट्र राज्य प्रमुख,
दिनांक, २९-४-२०२१.
पुणे:…..मराठे ज्वेलर्सचे मिलिंद ऊर्फ बळवंत मराठे यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणातील टोळीप्रमुख अ‍ॅड. दीप्ती काळे व निलेश शेलार यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई केली होती. अ‍ॅड. काळे, हिने इतरांच्या मदतीने बांधकाम व्यावसायिकाशी शारीरीक जवळीक साधून त्यांच्याकडून जबरदस्तीने ४२.गुंठे जमीन स्वत:च्या नावावर करुन घेतली. तसेच आणखी ५८. गुंठे जमीन नावावर करुन देण्यासाठी धमकाविल्याप्रकरणी फरासखाना पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. यापुर्वी देखील दिप्ती काळे हिने एका कॉंग्रेस नेत्यावर गंभीर आरोप करुन खळबळ उडवली होती.

दीप्ती काळे ही टोळीप्रमुख असून मागील १० वर्षात संघटित गुन्हेगारी टोळी तयार करुन प्रत्येक गुन्ह्यांमध्ये वेगवेगळे सदस्य घेऊन खुनाचा प्रयत्न, आत्महत्ये प्रवृत्त करणे, कट करुन खंडणी व बनावट व्हिडिओ तयार करुन अपलोड करणे असे गुन्हे केले आहेत. असा पोलिसांचा आरोप होता.ससून रुग्णालयाच्या आठव्या मजल्यावरून मोक्काच्या गुन्ह्यातील आरोपी असलेल्या महिलेने उडी मारुन आत्महत्या केली आहे. दीप्ती काळे असे या महिलेचे नाव आहे.

Aslam Khan

हर बड़े सफर की शुरुआत छोटे कदम से होती है। 14 फरवरी 2004 को शुरू हुआ श्रेष्ठ भारतीय टाइम्स का सफर लगातार जारी है। हम सफलता से ज्यादा सार्थकता में विश्वास करते हैं। दिनकर ने लिखा था-'जो तटस्थ हैं समय लिखेगा उनका भी अपराध।' कबीर ने सिखाया - 'न काहू से दोस्ती, न काहू से बैर'। इन्हें ही मूलमंत्र मानते हुए हम अपने समय में हस्तक्षेप करते हैं। सच कहने के खतरे हम उठाते हैं। उत्तरप्रदेश से लेकर दिल्ली तक में निजाम बदले मगर हमारी नीयत और सोच नहीं। हम देश, प्रदेश और दुनिया के अंतिम जन जो वंचित, उपेक्षित और शोषित है, उसकी आवाज बनने में ही अपनी सार्थकता समझते हैं। दरअसल हम सत्ता नहीं सच के साथ हैं वह सच किसी के खिलाफ ही क्यों न हो ? ✍असलम खान मुख्य संपादक

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button