मराठी

येरवडा जेलमध्ये धुवायला लावले कपडे … बाहेर पडताच घेतला बदला … पुरंदरमध्ये तरुणाचा निघृण खून

संवाददाता, तानाजी केदारी महाराष्ट्र राज्य प्रमुख.
दिनांक,१५-६-२०२१. पुण्यातील येरवडा कारागृहात शिक्षा भोगत असताना एका कैद्याने दुसऱ्या कैद्याला आपले कपडे धुवायला लावल्याचा बदला बाहेर येताच घेतला. येरवडा कारागृहात पाय दाबायला लावणे, कपडे धुवायला लावणे अशी कामे सांगितल्याचा राग कैद्याच्या मनात होता. कारगृहातून बाहेर येताच त्याने पुरंदरमधील एकचा निर्घृण खून करुन मृतदेह सातारा जिल्ह्याच्या हद्दीत टाकला. याप्रकरणी लोणंद पोलिसांनी मुख्य आरोपीला अटक केली आहे. तर त्याचा साथीदार फरार झाला आहे. आरोपी हे सराईत गुन्हेगार आहेत.

मंगेश सुरेंद्र पोम (वय-३५.रा. पोमणनगर, ता. पुरंदर) असे खून झालेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. तर वैभव सुभाष जगताप (वय-२८.रा. पांगारे, ता. पुरंदर) याला लोणंद पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. तर त्याचा साथीदार ऋषीकेश दत्तात्रय पायगुडे हा फरार झाला आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहे. वैभव आणि ऋषीकेश या दोघांनी मिळून मंगेशचा खून केला.
मयत मंगेश पोम हा काही दिवसांपूर्वी एका गंभीर गुन्ह्यात पुण्यातील येरवडा कारगृहात शिक्षा भोगत होता. तर आरोपी वैभव हा देखील एका गंभीर गुन्ह्यात शिक्षा भोगायला येरवडा कारागृहात आला होता. याच दरम्यान मयत मंगेश याने वैभवला पाय दाबायला लावणे, कपडे धुवायला लावणे अशी कामे लावली होती. याचा राग वैभवला आला होता. हे दोघे शिक्षा भोगून बाहेर आले होते.

Aslam Khan

हर बड़े सफर की शुरुआत छोटे कदम से होती है। 14 फरवरी 2004 को शुरू हुआ श्रेष्ठ भारतीय टाइम्स का सफर लगातार जारी है। हम सफलता से ज्यादा सार्थकता में विश्वास करते हैं। दिनकर ने लिखा था-'जो तटस्थ हैं समय लिखेगा उनका भी अपराध।' कबीर ने सिखाया - 'न काहू से दोस्ती, न काहू से बैर'। इन्हें ही मूलमंत्र मानते हुए हम अपने समय में हस्तक्षेप करते हैं। सच कहने के खतरे हम उठाते हैं। उत्तरप्रदेश से लेकर दिल्ली तक में निजाम बदले मगर हमारी नीयत और सोच नहीं। हम देश, प्रदेश और दुनिया के अंतिम जन जो वंचित, उपेक्षित और शोषित है, उसकी आवाज बनने में ही अपनी सार्थकता समझते हैं। दरअसल हम सत्ता नहीं सच के साथ हैं वह सच किसी के खिलाफ ही क्यों न हो ? ✍असलम खान मुख्य संपादक

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button