मराठी

ओबीसी जनगणना आणि आरक्षण टिकवण्यासाठी बलुतेदारांसह ओबीसी संस्थाचा यल्गार यशस्वी-रामदास सूर्यवंशी* *महाराष्ट्रात ओबीसी जनगणनेसाठी निरगुडे आयोगाचा होकार

संवाददाता, सौ. पार्वती ढोणे, महाराष्ट्र राज्य प्रभारी.
दिनांक,५-८-२०२१.

पुणे-ओबीसी आरक्षण कोर्टाने रद्द केल्यामुळे तसेच त्यासाठी इम्पीरिअल डाटा आवश्यक असल्याने राज्यात यासाठी आयोग स्थापन व्हावा असा आग्रह समता परिषद,बारा बलुतेदार विकास संघ यांनी मूख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे केला त्यात ओबीसी मंत्री ना विजय वडेट्टीवार यांनी ओबीसीसाठी राज्यात अनेक आंदोलने,मेळावे यात सहभाग घेत यासाठी खूप मेहनत घेतली.भाजपा व त्यांच्या ओबीसी मोर्चाने माजी मुख्यमंत्री मा. देवेन्द्र फडणवीस, व आ.चंद्रकांतदादा पाटील, व आ.पंकजा मुंडे,योगेश टिळेकर यांच्या नेतृत्वाखाली राज्यात आंदोलने केली.समता परिषदचे ना छगन भुजबळ, ,काॅग्रेसचे नाना पटोले,भानुदास माळी, व बारा बलुतेदारातर्फेही आम्ही राज्यात चळवळीच्या माध्यमातून लढा उभारण्यात आला.
या सर्व पक्ष व सामाजिक स॔स्थाच्या रेट्यातून निरगुडे कमिशनची स्थापना करण्यात आली व त्यांना ओबीसी जनगणना डाटा गोळा करण्याचे कार्य सोपवण्यात आले.आयोगाची स्थापना झाल्यावर पुण्यात नुकत्याच झालेल्या बैठकीपूर्वी समता परिषद,बारा बलुतेदार समाज विकास संघ आणि भटके विमुक्त संस्था यांनी आपल्या मागण्या आयोगाला सादर करीत त्यांच्याशी चर्चा केली.
यावेळी आयोगाचे अध्यक्ष मा. ए.व्ही निरगुडे यांना प्रदेशाध्यक्ष रामदास सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली शहराध्यक्ष राजेश भोसले, यांनी बारा बलुतेदार समाज विकास संघाचे निवेदन दिले याप्रसंगी रामदास सूर्यवंशी यांनी ओबीसी जनगणनेसाठी दोन दशके पाठपुरावा करताना अनेकदा केलेल्या आंदोलनाचा परामर्श देताना मागील गायकवाड कमिशनशी केलेला पत्रव्यवहाराची माहीती दिली तसेच बलुतेदारांना बजेट,महामंडळ व विशेष आरक्षणाची मागणी यावेळी त्यांच्याकडे केली.मुख्यमंत्री,विरोधी पक्षनेते,बहुजन मंत्री,विविध पक्षाचे प्रदेशाध्यक्ष व आयोग यांना केलेल्या पाठपुराव्याची माहीती व कागदपत्रे सूर्यवंशी यांनी दिली.
याप्रसंगी मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष मा. ए.व्ही निरगुडे, म्हणाले की आपण केलेली मागणीबाबत आम्ही सकारात्मक असून कायद्याच्या कक्षेत बसवणे यासाठी प्रयत्न करू तसेच जनगणनेसाठी सकारात्मक राहणार असल्याचे प्रतिपादन केले.त्यानंतर झालेल्या बैठकीत त्यांनी जनगणनेच्या माध्यमातून इम्पिरिअल डाटा गोळा करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला.त्याबद्दल कमिशनचे अध्यक्ष व कमिटी मेम्बरचे आभार बारा बलुतेदारातर्फे प्रदेशाध्यक्ष मा.रामदास सूर्यवंशी यांनी मानले.

Aslam Khan

हर बड़े सफर की शुरुआत छोटे कदम से होती है। 14 फरवरी 2004 को शुरू हुआ श्रेष्ठ भारतीय टाइम्स का सफर लगातार जारी है। हम सफलता से ज्यादा सार्थकता में विश्वास करते हैं। दिनकर ने लिखा था-'जो तटस्थ हैं समय लिखेगा उनका भी अपराध।' कबीर ने सिखाया - 'न काहू से दोस्ती, न काहू से बैर'। इन्हें ही मूलमंत्र मानते हुए हम अपने समय में हस्तक्षेप करते हैं। सच कहने के खतरे हम उठाते हैं। उत्तरप्रदेश से लेकर दिल्ली तक में निजाम बदले मगर हमारी नीयत और सोच नहीं। हम देश, प्रदेश और दुनिया के अंतिम जन जो वंचित, उपेक्षित और शोषित है, उसकी आवाज बनने में ही अपनी सार्थकता समझते हैं। दरअसल हम सत्ता नहीं सच के साथ हैं वह सच किसी के खिलाफ ही क्यों न हो ? ✍असलम खान मुख्य संपादक

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button