मराठी

विश्वविजेता पै.राहुल आवारे लग्नाच्या बोहल्यावर

संवाददाता. तानाजी केदारी. (महाराष्ट्र राज्य प्रमुख).:महाराष्ट्राचा लाडका मल्ल,राष्ट्रकुल सुवर्णपदक विजेता,जागतिक कांस्यपदक विजेता,पोलीस उप अधीक्षक (Dysp) पै.राहुल आवारे लवकरच लग्नाच्या बोहल्यावर चढणार आहे.बुधवार दिनांक 9 ऑक्टोबर 2019 रोजी पुण्यामध्ये त्यांचा साखरपुडा कार्यक्रम संपन्न होणार आहे.

अर्जुनवीर काकासाहेब पवार यांची कन्या कु.ऐश्वर्या काकासाहेब पवार हिच्याशी पै.राहुल बाळासाहेब आवारे यांचा विवाह नक्की करण्यात आला असून येत्या 9 ऑक्टोबर 2019 रोजी साखरपुडा कार्यक्रम होईल.

अर्जुनवीर काकासाहेब पवार हे पै.राहुल आवारे याचे गुरु असून कै. हरिश्चंद्र बिराजदार यांच्यानंतर राहुलवर पुत्रवत प्रेम त्यांनी केले.

पै.राहुल आवारे याने नुकतेच कझाकिस्तान येथे झालेल्या जागतिक कुस्ती स्पर्धेत कांस्यपदक मिळवून महाराष्ट्राच्या कुस्ती क्षेत्रात एक इतिहास रचला.महाराष्ट्र शासनाने त्याला प्रथम वर्ग नोकरी प्रदान करुन त्याच्या कारकीर्दीला गौरव यापुर्वीच केला आहे.राहुल सध्या Dysp प्रशिक्षण घेत आहे.

पै.राहुल आवारे याच्यावर प्रेम करणाऱ्या महाराष्ट्र तसेच देशातील कुस्तीप्रेमींना राहुल च्या लग्नाची बातमी नक्कीच आनंद देणारी असून आता आवारे व पवार घराणे आता नातेसंबंधात बांधले जाणार हे सुद्धा चित्र सर्वाना आनंदित करणारे आहे.

पै. राहुल आवारे व कु.ऐश्वर्या पवार यांच्या साखरपुडा समारंभास आपल्या सर्वांची उपस्थिती प्रार्थनिय आहे असे पवार व आवारे उभय मंडळींकडून आमंत्रण देण्यात येत आहे.

कुस्ती मल्लविद्या महासंघ महाराष्ट्र राज्य यांच्याकडून सदर सोहळ्यास खूप खूप शुभेच्छा.

*दिनांक व वेळ*
बुधवार दिंनक 9 ऑक्टोबर 2019
सायंकाळी – 5.30 ते 7 वा.
*स्थळ*
ऐश्वर्या बॅक्वेट हॉल.
आंबेगाव,पुणे.

Aslam Khan

हर बड़े सफर की शुरुआत छोटे कदम से होती है। 14 फरवरी 2004 को शुरू हुआ श्रेष्ठ भारतीय टाइम्स का सफर लगातार जारी है। हम सफलता से ज्यादा सार्थकता में विश्वास करते हैं। दिनकर ने लिखा था-'जो तटस्थ हैं समय लिखेगा उनका भी अपराध।' कबीर ने सिखाया - 'न काहू से दोस्ती, न काहू से बैर'। इन्हें ही मूलमंत्र मानते हुए हम अपने समय में हस्तक्षेप करते हैं। सच कहने के खतरे हम उठाते हैं। उत्तरप्रदेश से लेकर दिल्ली तक में निजाम बदले मगर हमारी नीयत और सोच नहीं। हम देश, प्रदेश और दुनिया के अंतिम जन जो वंचित, उपेक्षित और शोषित है, उसकी आवाज बनने में ही अपनी सार्थकता समझते हैं। दरअसल हम सत्ता नहीं सच के साथ हैं वह सच किसी के खिलाफ ही क्यों न हो ? ✍असलम खान मुख्य संपादक

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button