पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेच्या हद्दीतील* *बोपखेल फाटा ते गणेशनगर या रस्त्याचे तत्काळ रुंदीकरण करा, अशी मागणी* *पिंपरी विधानसभेच्या युवतीसेनाप्रमुख प्रतिक्षा घुले यांनी अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांच्याकडे केली आहे

संवाददाता, तानाजी केदारी, महाराष्ट्र राज्य प्रमुख.
दिनांक,१-९-२०२१.
१२ वर्षांचा काळ उलटून गेला आहे, बोपखेल गावचा लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे, त्यात बोपखेल-दापोडी रस्ता बंद झाला आहे, बोपखेल-खडकी पुलाचे काम अद्यापही अर्धवट अवस्थेतच बंद पडले आहे,परिणामी सर्व भार बोपखेल फाटा-गणेशनगर-रामनगर-बोपखेल ह्या रस्त्यावर आला आहे, त्यामुळे येथे रोजच वाहतुकीचा खोळंबा होत आहे,अपघाताचे प्रमाण वाढले आहे, पादचारी लोकांना स्वतंत्र ट्रॅक नाहीये, दुसरा कोणताही पर्याय नसल्याने पादचारी जीव मुठीत धरुन वाहतुकीच्या रस्त्याने चालत प्रवास करत आहेत,ह्या सर्व बाबी व बोपखेल, रामनगर,गणेशनगर,मधील ग्रामस्थांची कैफियत आज अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे साहेब, ह्यांच्या समोर पिंपरी विधानसभेच्या युवतीसेनाप्रमुख प्रतिक्षा घुले, ह्यांनी मांडली. यासमयी पिंपरी-चिंचवड युवासेनेचे प्रमुख विश्वजीत बारणे, शहर समन्वयक रुपेश कदम, सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण घुले, विधानसभा प्रमुख निलेश हाके, माऊली जगताप, राजेंद्र तरस, सनी कड, अविनाश जाधव, आर.डी.गिल उपस्थित होते.