खासगी दुचाकी वाहनांस पेट्रोल बंदी मुळे आत्यावशक सेवेवर होणार का परिणाम ?
अहमदनगर प्रतिनिधी / विलास गिर्हे कोरोना संसर्गाच्या महामारी आजाराच्या पार्शभुमिवर जिल्ह्यासह देशात लाॅकडावुन असल्याने कोरोनाचा संर्सग वाढु नये या साठी काल अहमदनरचे जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी खासगी दुचाकी थ्री व्हीलर व चारचाकी वाहनांना पेट्रोल पंपावर पेट्रोल न देण्याचा आदेश जारी केल्याने आज शेतकरी पोलिस कर्मचारी पाटबंधारे विभागाचे कर्मचारी महावितरण मिडीयाचे प्रतिनिधी. महसुलचे कर्मचारी, जिल्हा परिषद पंचायत समितीचे कर्मचारी बॅक नगरपालिका पाणीपुरवठा न्यायालीयन कर्मचारी पेपर वितरण एज्नसीचे कर्मचारी खाजगी पशुवैद्यकीय सेवेतील डाॅक्टर कृषी विध्यापीठचे सुरक्षा रक्षक खासगी क्षेत्रातील सुरक्षा सेवे तील कर्मचारी यांचेत मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. कारण जिल्हाधिकारीयांने काढलेल्या आदेशा मध्ये फक्त शासकीय वाहने डाॅक्टर आरोग्य कर्मचारी व आरोग्या विषयी कर्मचारी यांच्याच खासगी वाहनांना पेट्रोल मिळणार असलेने. बाकी आत्यवाशक सेवे शासकीय कर्मचारी यांना लाॅकडावुन मुळे एसटी बस चालु नसल्याने कामावर येणे साठी अडचन निर्माण झाली आहे. तसेच ग्रामिण भागातील बरेच शेतकरी डेरीवर दुध घालण्या सह शहरात जावुन फेरी मारुन दुध विक्री करतात . बरेच शेतकरी आपल्याकडील ऊपल्बध भाजी पाला दुचाकी वर क्रेट ठेवुन शहरात बाजार समिती व फेरी करुन विकत असल्याने त्यांना पेट्रोल न मिळाल्याने भाजी सह दुध विक्रीसाठी आनता येणार नसल्याने शेतकर्यांचे नुकसानी सह आत्यवश्यक वस्तु शहरात येवु शकणार नाही . त्या मुळे काही प्रमाणात का होईना खाजगी दुचाकी वाहनांसाठी अट थितील करणे गरजेचे असल्याचे वरील सर्व विभागातील नागरिकांच्या वतीने बोलले जात होते . तसेच खासगी वाहनांन मध्ये.घरगुती गॅस सिलेंडर. तसेच खते. बी बियाने .सह आत्यावशक वस्तु ने आन करणे आवघड होणार असल्याची ही सर्वत्र एकण्यास मिळत होती. आत्ता जिल्हाधिकारी या वर काय निर्णय घेतात हे पाहणे महत्वाचे असणार आहे.