मराठी

या लसीचा फक्त एकच डोस दिला जाणार ? लवकर लसीकरण धोरण बदलण्याची शक्यता

संवाददाता, तानाजी केदारी, महाराष्ट्र राज्य प्रमुख.
दिनांक-२-६-२०२१. ऑक्सफर्ड-अ‍ॅस्ट्रॉझेनेका यांनी विकसित केलेल्या आणि भारतात सीरम इन्स्टिट्यूटमध्ये उत्पादित केल्या जात असलेल्या कोव्हिशिल्ड या लशीचा एकच डोस पुरेसं संरक्षण देऊ शकेल का, याविषयी देशात अभ्यास करण्यात येणार आहे. महिनाभरात या अभ्यासाला सुरुवात होण्याची शक्यता असून, नवीन लसीकरण रणनीती ठरवताना याचा विचार केला जाईल, अशी माहिती एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यानं सीएनएन-न्यूज १८.ला दिली.

दोन वेगवेगळ्या लशींचे डोस देणं आणि कोव्हिशिल्डच्या एकाच डोसची उपयुक्तता या दोन्ही विषयावर अभ्यास सुरू करण्यासाठी आरोग्य मंत्रालयाअंतर्गत असलेल्या राष्ट्रीय समितीकडून मंजुरी मिळण्याची प्रतीक्षा करत असल्याचं या अधिकाऱ्यानं सांगितलं. सरकार पहिल्या आणि दुसर्‍या डोससाठी दोन वेगवेगळ्या लशींचा वापर करण्याबाबत अभ्यास करण्याचा विचार करत असल्याचं सीएनएन-न्यूज १८.नं यापूर्वीच सांगितलं होतं. एका नवीन आंतरराष्ट्रीय संशोधनानुसार, ऑक्सफर्ड-अ‍ॅस्ट्रॉझेनेका आणि फायझरच्या (Pfizer) लशीचा एकत्रित प्रभाव चांगला दिसून आला आहे.

Aslam Khan

हर बड़े सफर की शुरुआत छोटे कदम से होती है। 14 फरवरी 2004 को शुरू हुआ श्रेष्ठ भारतीय टाइम्स का सफर लगातार जारी है। हम सफलता से ज्यादा सार्थकता में विश्वास करते हैं। दिनकर ने लिखा था-'जो तटस्थ हैं समय लिखेगा उनका भी अपराध।' कबीर ने सिखाया - 'न काहू से दोस्ती, न काहू से बैर'। इन्हें ही मूलमंत्र मानते हुए हम अपने समय में हस्तक्षेप करते हैं। सच कहने के खतरे हम उठाते हैं। उत्तरप्रदेश से लेकर दिल्ली तक में निजाम बदले मगर हमारी नीयत और सोच नहीं। हम देश, प्रदेश और दुनिया के अंतिम जन जो वंचित, उपेक्षित और शोषित है, उसकी आवाज बनने में ही अपनी सार्थकता समझते हैं। दरअसल हम सत्ता नहीं सच के साथ हैं वह सच किसी के खिलाफ ही क्यों न हो ? ✍असलम खान मुख्य संपादक

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button