मामांमुळे दादा अडचणीत येणार ? ऐपत नसतानाही कर्ज कशासाठी ? सातारा व पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला नोटीस

संवाददाता,तानाजी केदारी,महाराष्ट्र राज्य प्रमुख.
दिनांक,१३-७-२०२१. सातारा व पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला त्याबाबत नोटीस बजावण्यात आली आहे. बँकेने जरंडेश्वरला ९६.कोटी रुपयांचे कर्ज पुरविले होते. कारखान्याची ऐपत नसताना त्यांना हे कर्ज कशाच्या आधारावर मंजूर करण्यात आले, त्यासाठी तारण काय घेण्यात आले, आदींबाबत सविस्तर तपशील ईडीला हवा असल्याची माहिती सूत्रांनी दिली. जिल्हा बँकेला ईडीच्या नोटिसीला संचालक मंडळाला १०.दिवसांत उत्तर द्यावे लागणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.
महाराष्ट्रात साखर कारखान्यांना चार सहकारी बँकांनी दिलेल्या ७५०.कोटी रुपयांच्या कर्ज प्रकरणाची चौकशी करणाऱ्या ईडीच्या रडारवर राज्याचे मुख्यमंत्री अजित पवार,आले आहेत. हा साखर कारखाना ज्या कंपनीने लीजवर घेतला होता त्या कंपनीचा संबंध अजित पवार, आणि त्यांच्या पत्नीशी असल्याचे सांगितले जाते. मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडी या प्रकरणाची चौकशी करीत आहे. ईडीने ज्या चार सहकारी बँकांना नोटीस बजावली आहे त्यात पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचाही समावेश आहे. या बँकेच्या संचालकपदीही पवार होते.