मराठी

फोनवरुन शिवीगाळ का केली? जाब विचारायला गेलेल्या दोघांची पुण्यात निर्घृण हत्या

संवाददाता,पार्वती ढोणे, महाराष्ट्र राज्य प्रभारी.
दिनांक,७-७-२०२१.
फोनवरुन शिवीगाळ का केली, म्हणून जाब विचारायला गेलेल्या दोन युवकांवर प्राणघातक हल्ला करण्यात आला. डोक्यात दगड घालून दोघांची निर्घृण हत्या करण्यात आली. पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात रविवारी ही घटना घडली. या प्रकरणातील आठही आरोपी पसार झाले आहेत.

शिवम संतोष शितकल (वय २४.) गणेश रमेश माकर, (वय २३ ) दोघेही रा. पाटस (अंबिकानगर ता. दौंड, जि. पुणे) अशी खून झालेल्या युवकांची नावे आहेत. फोनवरुन शिवीगाळ का केली, म्हणून जाब विचारायला गेलेल्या दोन युवकांची डोक्यात दगड घालून हत्या करण्यात आली. दौंड तालुक्यातील पाटस येथील तामखंडा येथील भानोबा मंदिरासमोर रविवारी रात्री ही घटना घडली.
या प्रकरणी आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून यातील सर्व आरोपी फरार आहेत. या घटनेमुळे रात्रीपासून पाटस गावामध्ये तणावाचे वातावरण आहे. या प्रकरणी मन्या उर्फ महेश संजय भागवत, मोहन टुले योगेश शिंदे आणि इतर पाच अनोळखी युवकांवर हत्येचा गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. पाटस गावामध्ये रात्रीपासून तणाव निर्माण झाले आहे.

Aslam Khan

हर बड़े सफर की शुरुआत छोटे कदम से होती है। 14 फरवरी 2004 को शुरू हुआ श्रेष्ठ भारतीय टाइम्स का सफर लगातार जारी है। हम सफलता से ज्यादा सार्थकता में विश्वास करते हैं। दिनकर ने लिखा था-'जो तटस्थ हैं समय लिखेगा उनका भी अपराध।' कबीर ने सिखाया - 'न काहू से दोस्ती, न काहू से बैर'। इन्हें ही मूलमंत्र मानते हुए हम अपने समय में हस्तक्षेप करते हैं। सच कहने के खतरे हम उठाते हैं। उत्तरप्रदेश से लेकर दिल्ली तक में निजाम बदले मगर हमारी नीयत और सोच नहीं। हम देश, प्रदेश और दुनिया के अंतिम जन जो वंचित, उपेक्षित और शोषित है, उसकी आवाज बनने में ही अपनी सार्थकता समझते हैं। दरअसल हम सत्ता नहीं सच के साथ हैं वह सच किसी के खिलाफ ही क्यों न हो ? ✍असलम खान मुख्य संपादक

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button