मराठी

विधानसभा अध्यक्षपदी कोण , कोणाकडे किती संख्याबळ ? असं असणार राजकीय गणित

संवाददाता,पार्वती ढोणे, महाराष्ट्र राज्य प्रभारी.
दिनांक,२-७-२०२१.
विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या वरून महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असा राजकीय आमदारांचा आकडेवारीचा खेळ पावसाळी अधिवेशनात सर्वांचे लक्ष वेधणार आहे. विधानसभा अध्यक्षपद हे नाना पटोले यांच्या काँग्रेस पक्षाध्यक्ष नियुक्तीनंतर रिक्त आहे. आता काँग्रेसने येत्या पावसाळी अधिवेशनात विधानसभा अध्यक्ष पदाची निवडणूक जाहीर करावी यासाठी आग्रही भूमिका घेतली आहे. ज्यावेळेस महाविकास आघाडी सरकार स्थापन झाले त्यावेळेस बहुमताचा आकडा सिद्ध करताना महाविकास आघाडी कडे १७२.आमदार होते. आता कोविड कालावधीत काँग्रेस पक्षाच्या एका आमदाराचे निधन झालं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्याकडे पंढरपूरची असलेली जागा भाजपाने जिंकत राष्ट्रवादीचा आमदार एक कमी झाला आहे.

तर भाजपची संख्या वाढली मात्र त्याच दरम्यान एका आमदाराचा पाठिंबा कमी झाला आहे. अपक्ष निवडून आलेल्या गीता जैन यांनी शिवसेनेला पाठिंबा देत शिवसेनेत प्रवेश केला आहे. विधानसभा अध्यक्ष पदाची निवडणूक जाहीर होताना महाविकास आघाडीला सरकार स्थापन करताना जितकी संख्याबळ होतं तितकीच त्यांच्याकडे कायम राहीलं हे दाखवून आव्हान असणार आहे.

Aslam Khan

हर बड़े सफर की शुरुआत छोटे कदम से होती है। 14 फरवरी 2004 को शुरू हुआ श्रेष्ठ भारतीय टाइम्स का सफर लगातार जारी है। हम सफलता से ज्यादा सार्थकता में विश्वास करते हैं। दिनकर ने लिखा था-'जो तटस्थ हैं समय लिखेगा उनका भी अपराध।' कबीर ने सिखाया - 'न काहू से दोस्ती, न काहू से बैर'। इन्हें ही मूलमंत्र मानते हुए हम अपने समय में हस्तक्षेप करते हैं। सच कहने के खतरे हम उठाते हैं। उत्तरप्रदेश से लेकर दिल्ली तक में निजाम बदले मगर हमारी नीयत और सोच नहीं। हम देश, प्रदेश और दुनिया के अंतिम जन जो वंचित, उपेक्षित और शोषित है, उसकी आवाज बनने में ही अपनी सार्थकता समझते हैं। दरअसल हम सत्ता नहीं सच के साथ हैं वह सच किसी के खिलाफ ही क्यों न हो ? ✍असलम खान मुख्य संपादक

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button