भूक म्हणजे काय, आम्ही जाणतो’ … दापोडीतील सामाजिक कार्यकर्ते ‘संदीप गायकवाड’ यांनी ५०० कुटूंबाना दिला मदतीचा हात

*‘भूक म्हणजे
संवाददाता, तानाजी केदारी, महाराष्ट्र राज्य प्रमुख.
दिनांक. २१-४-२०२१.
(दि. १९ एप्रिल) : पिंपरी चिंचवड शहरात कोरोनाच्या संसर्गाचा कहर झाला आहे. मागच्या लॉकडाऊनमध्ये अनेकजण उपासमार होत असल्यामुळे चालत गावी गेले होते. यामध्ये भुकेमुळे अनेकांचे प्राण देखील गेले होते. हीच बाब लक्षात घेत दापोडी येथील सामाजिक कार्यकर्ते संदीप गायकवाड व मनीषा गायकवाड यांनी पुढाकार घेत दापोडी परिसरातील गरजू, गोरगरिब ५०० कुटुंबाना अन्नधान्य किटचे वाटप केले.
संदीप गायकवाड यांनी सर्वसामान्य नागरिकांसाठी घासाची सोय केली आहे. ‘भूक म्हणजे काय आम्ही जाणतो’ तसेच या संकटकाळी आपल्या घासातील एक घास या भुकेलेल्याना देणं हे आपलं सामाजिक कर्तव्य आहे. या सामाजिक भावनेतून आपण हे कार्य करत आहे, असे संदीप गायकवाड यांनी यावेळी बोलताना सांगितले.