अपहरण करून खंडणी मागणारा तोतया पोलीस वाकड पोलिसांच्या ताब्यात

संवाददाता,तानाजी केदारी, महाराष्ट्र राज्य प्रमुख.
दिनांक,१९-६-२०२१.
पिंपरी चिंचवड दिनांक. १८ .वाकड येथील स्पंदन हॉस्पिटलमधील मेडीकलमध्ये काही लोक घुसन त्यांनी पोलीस असल्याचे सांगुन एमटीपी किटची कारवाई करण्याची धमकी देवुन गर्भपाताच्या गोळ्या मेडिकलमध्ये ठेवल्यास खुनाचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत तसेच पोलीस असल्याचे सांगत सहा जणांनी मिळून एका मेडिकल व्यावसायिकाचे अपहरण केले. तसेच मेडिकल व्यवसायिकाकडे सहा लाखांची खंडणी मागितली. याप्रकरणी वाकड पोलिसांनी सहा जणांना अटक करून व्यापाऱ्याची सुखरूप सुटका केली. ही घटना डांगे चौक, थेरगाव येथे मंगळवारी (ता.१५.) सायंकाळी सहाच्या सुमारास घडली.अशोक बेलिराम आगरवाल /वय ५३.रा.विकास नगर किवळे/असे अपहरण आणि सुटका झालेल्या मेडिकल व्यसायिकाचे नाव आहे त्यांनी याबाबत वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे टायगर ग्रुपचा अध्यक्ष सिद्धार्थ भारत गायकवाड /वय ३२./ राहुल छगन लोंढे /वय २४./प्रकाश मधुकर सजगणे /वय ३१.तिघे रा अष्टविनायक कॉलनी वाकड /प्रीतेश बबनराव लांडगे /वय ३०.रा प्रभात कॉलनी वाकडं/ कमलेश बाफना संतोष ओव्हाळ व आकाश हारकरे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी यांचे डांगे चौकात स्पंदन मिडिकल आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed