मराठी

मतदार जागृती अभियानाला शिर्डी मतदारसंघातून सुरुवात प्रादेशिक लोकसंपर्क कार्यालयाचा उपक्रम

शिर्डी, अहमदनगर प्रतिनिधी विलास गिर्‍हे दि. 17 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या राज्यातील विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणूकीत मतदानाची टक्केवारी वाढविणे, नवमतदारास मतदान करण्यासाठी प्रोत्साहीत करणे, शातंता तसेच निर्भय वातावरणात अथवा कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता भारतातील लोकशाही मतदानाच्या माध्यमातून बळकट करण्यासाठी श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डी च्या मंदीर परिसरातून पुणे येथील माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या, प्रादेशिक लोकसंपर्क कार्यालय व शिर्डी विधानसभा निवडणूक निर्णय अधिकारी, माहिती अधिकारी, उप माहिती कार्यालय, शिर्डी आदी विभागाच्या वतीने आयोजित फिरत्या मतदार जनजागृती वाहन पथकाचे उद्घाटन नवी दिल्ली लोकसंपर्क तथा संचार कार्यालयाच्या अपर महासंचालिका श्रीमती रंजना देवी शर्मा यांच्या हस्ते फित कापून आज 17 ऑक्टोबर,2019 रोजी करण्यात आले. यावेळी वाहनास हिरवी झेंडी दाखवून वाहनाचा प्रारंभ करण्यात आला.

यावेळी शिर्डी विधानसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी गोविंद शिंदे, स्विपचे नोडल अधिकारी पोपट काळे, श्री. वाकचौरे, नायब तहसिलदार श्री. म्हस्के, अहमदनगर येथील क्षेत्रीय लोकसंपर्क कार्यालयाचे क्षेत्रीय प्रचार अधिकारी माधव जायभाये, अलिम खान, पी. कुमार, छायाचित्रकार सुनिलदत्त शिवदे आदी मान्यवर उपस्थित होते.

श्रीमती रंजना देवी शर्मा यांनी सर्व मतदारांनी विशेषत महिला मतदारांनी येत्या विधानसभा निवडणूकीत शंभर टक्के मतदान करून भारतीय लोकशाही बळकट करण्याचे आवाहन केले तर गोविंद शिंदे यांनी शिर्डी विधानसभा मतदार संघात मतदार जनजागृतीच्या माध्यमातून करण्यात आलेल्या कार्याची माहिती देऊन एकही मतदार मतदानापासून वंचीत राहणार नाही . तसेच जात धर्म असा भेदभाव न करता आपल्या अनमोल अशा मतदानाचा हक्क बजवावा असे ते म्हणाले.

हे फिरते वाहन पथकातील प्रादेशिक लोकसंपर्क कार्यालयाच्या सांस्कृतिक कलापथकाच्या माध्यमातून मतदारांमध्ये जनजागृती करण्यासाठी राज्यातील मतदानाची कमी टक्केवारी असलेल्या सर्व विधानसभा मतदार संघातून हे फिरते वाहन पथक फिरविण्यात येत आहे. अहमदनगर जिल्ह्यातील नगर, शिर्डी, नेवासा तसेच श्रीरामपूर या विधानसभा मतदार संघामध्ये हे वाहन दिनांक 16 ऑक्टोबर पासून जनजागृती करीत आहे.

****

Aslam Khan

हर बड़े सफर की शुरुआत छोटे कदम से होती है। 14 फरवरी 2004 को शुरू हुआ श्रेष्ठ भारतीय टाइम्स का सफर लगातार जारी है। हम सफलता से ज्यादा सार्थकता में विश्वास करते हैं। दिनकर ने लिखा था-'जो तटस्थ हैं समय लिखेगा उनका भी अपराध।' कबीर ने सिखाया - 'न काहू से दोस्ती, न काहू से बैर'। इन्हें ही मूलमंत्र मानते हुए हम अपने समय में हस्तक्षेप करते हैं। सच कहने के खतरे हम उठाते हैं। उत्तरप्रदेश से लेकर दिल्ली तक में निजाम बदले मगर हमारी नीयत और सोच नहीं। हम देश, प्रदेश और दुनिया के अंतिम जन जो वंचित, उपेक्षित और शोषित है, उसकी आवाज बनने में ही अपनी सार्थकता समझते हैं। दरअसल हम सत्ता नहीं सच के साथ हैं वह सच किसी के खिलाफ ही क्यों न हो ? ✍असलम खान मुख्य संपादक

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button