पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी लि.च्या माध्यमातून विविध विकासकामे प्रगतीपथावर

संवाददाता, सौ. पार्वती ढोणे, महाराष्ट्र राज्य प्रभारी.
दिनांक,११-६-२०२१. पिंपरी चिंचवड हे देशातील एक प्रमुख महानगर आहे. पिंपरी चिंचवडची केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटी मिशनच्या तिसऱ्या फेरीमध्ये समावेश झाल्यानंतर पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी लि.ची स्थापना करण्यात आली.स्मार्ट सिटी लि.च्या माध्यमातून शहरामध्ये विविध विकासकामांची सुरुवात करण्यात आली आहे.या विकासकामांमुळे शहरामध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मुलभूत सोयीसुविधांची निर्मिती होत असून शहराच्या सौंदर्यात भर पडत आहे.
सुरवातीला शहराच्या निवडक भागांमध्ये एरिया बेस्ड डेव्हलपमेंट (ABD) अंतर्गत नवनवीन विकासकामे करण्यात येत आहेत. शहरातील पिंपळे गुरव भागातील जिजामाता उद्यानाच्या सभोवतालच्या परिसराचा कायापालट करण्यात येत आहे. उद्यानाच्या प्रवेशद्वारापाशी नागरिकांना बसण्यासाठी बाक, फूड प्लाझा, सोलर ट्री, इलेक्ट्रिक वाहन (EV) चार्जिंग स्टेशन, टॉयलेटस इत्यादींची निर्मिती करण्यात येत आहे. येथे येणाऱ्या नागरिकांच्या वाहनांच्या सुरक्षिततेसाठी वाहनतळ विकसित करण्यात येणार आहे. तसेच संरक्षक भिंतीवर स्टोन क्लॅडींग करण्यात येणार आहे. या परिसरात वृक्षारोपण करण्यात आल्यामुळे सर्व परिसर हिरवाईने नटलेला दिसणार आहे.