मराठी

वैष्णव काटे फौंडेशनच्या वतीने भोसरी पोलिस स्टेशन मधील पोलिस बांधवांचा कोरोना योद्धा पुरस्काराने सन्मान!

संवाददाता,सौ.पार्वती ढोणे, महाराष्ट्र राज्य प्रभारी.
दिनांक,२२-७-२०२१.
उपमुख्यमंत्री मा. श्री. अजितदादा पवार, यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच पिंपरी विधानसभा आमदार मा. श्री. आण्णासाहेब बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली दापोडी येथील वैष्णव काटे फाऊंडेशनच्या वतीने कोरोना योद्धांचा सन्मान करण्यात आला. भोसरी पोलीस स्टेशन मध्ये युवा नेते वैष्णव दत्तात्रय काटे, यांच्या हस्ते वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर अवताडे, यांचा कोरोना योध्दा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. तसेच गुन्हे शाखेचे जितेंद्र कदम,आदी पोलीस बांधवांचा, भगिनींचा कोरोना योध्दा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.

कोरोनाच्या काळात स्वतःच्या जीवाची पर्वा न करता जनतेचे रक्षण करणाऱ्या भोसरी पोलीस स्टेशन मधील पोलीस बांधवांचा दापोडी येथील युवा नेते वैष्णव दत्तात्रय काटे, यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. याप्रसंगी राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी मुख्य संघटिका सुप्रियाताई काटे, महिला बचत गट महासंघ अध्यक्षा अस्मिता ताई कांबळे, ओबीसी सेल शहराध्यक्ष निर्मला माने, अल्पसंख्या अध्यक्ष शिवाजीनगर विधानसभा दिलशाद नाजिम आत्तार, महिला पिंपरी चिंचवड शहर जिल्हा उपाध्यक्षा वर्षा झपके (काटे), सुशांत डावखर, ऋतिक बनसोडे, कुणाल ऊंडे, पियुष आरगडे, आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

Aslam Khan

हर बड़े सफर की शुरुआत छोटे कदम से होती है। 14 फरवरी 2004 को शुरू हुआ श्रेष्ठ भारतीय टाइम्स का सफर लगातार जारी है। हम सफलता से ज्यादा सार्थकता में विश्वास करते हैं। दिनकर ने लिखा था-'जो तटस्थ हैं समय लिखेगा उनका भी अपराध।' कबीर ने सिखाया - 'न काहू से दोस्ती, न काहू से बैर'। इन्हें ही मूलमंत्र मानते हुए हम अपने समय में हस्तक्षेप करते हैं। सच कहने के खतरे हम उठाते हैं। उत्तरप्रदेश से लेकर दिल्ली तक में निजाम बदले मगर हमारी नीयत और सोच नहीं। हम देश, प्रदेश और दुनिया के अंतिम जन जो वंचित, उपेक्षित और शोषित है, उसकी आवाज बनने में ही अपनी सार्थकता समझते हैं। दरअसल हम सत्ता नहीं सच के साथ हैं वह सच किसी के खिलाफ ही क्यों न हो ? ✍असलम खान मुख्य संपादक

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button