मराठी

पिंपरी चिंचवड शहरातील लसीकरण केंद्रे एक दिवसाआड करावीत … योग्य नियोजना करिता राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्याध्यक्ष ‘प्रशांत शितोळे’ यांचे आयुक्तांना सूचना वजा साकडे

*पिंपरी चिंचवड शहरातील लसीकरण केंद्रे एक दिवसाआड करावीत … योग्य नियोजना करिता राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्याध्यक्ष ‘प्रशांत शितोळे’ यांचे आयुक्तांना सूचना वजा साकडे!*
संवाददाता, सौ. पार्वती ढोणे, महाराष्ट्र राज्य प्रभारी.
दिनांक, १२-५-२०२१.
पिंपरी-चिंचवड शहरात गेली दोन महिने कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण चालू आहे. परंतु गेल्या काही दिवसांपासून लसीकरणाची पूर्ण व्यवस्था केंद्र शासन, राज्य शासन व स्थानिक स्वराज्य संस्था यांच्यात समन्वय नसल्यामुळे पूर्णपणे बिघडलेली आहे असे चित्र आहे व त्यामुळे नागरिक हैराण झालेले आहेत.

याच गोष्टीची दखल घेत नागरिकांना होणारा त्रास कसा कमी करता येईल याचा विचार करून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे, यांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत. पिंपरी-चिंचवड शहरात महानगरपालिकेनं जवळपास ९०.ठिकाणी लसीकरण केंद्र केली परंतु, या केंद्रांमध्ये लसीकरण चालू झाल्यापासून ते आजपर्यंत किती लसीकरण झाले ? यासाठी किती मनुष्यबळ लागले ? किती दिवस बिना लसीकरणाचे गेले? याचा विचार केला तर तुटपुंजा आकडा समोर येतो.

लसीकरणाच्या सुरुवातीला लसीकरण करून घेण्याचे प्रमाण कमी होते परंतु गेल्या काही दिवसांमध्ये लसीकरण करून घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिक केंद्रांवर गर्दी करत आहेत त्यातच केंद्र सरकारने प्रत्येक नागरिकास लस मिळेल यासाठी cowin वेबसाईटवर ऑनलाइन पद्धतीने नोंदणी करण्यास सांगितले परंतु लस उपलब्धता करून दिली नाही. त्यामुळे अनेक लोक आज लसीकरणापासून वंचित राहत आहेत, तर अनेक जण पहिला डोस मिळाल्यानंतर दुसरा डोस मिळत नाही म्हणून वंचित राहत आहेत.

Aslam Khan

हर बड़े सफर की शुरुआत छोटे कदम से होती है। 14 फरवरी 2004 को शुरू हुआ श्रेष्ठ भारतीय टाइम्स का सफर लगातार जारी है। हम सफलता से ज्यादा सार्थकता में विश्वास करते हैं। दिनकर ने लिखा था-'जो तटस्थ हैं समय लिखेगा उनका भी अपराध।' कबीर ने सिखाया - 'न काहू से दोस्ती, न काहू से बैर'। इन्हें ही मूलमंत्र मानते हुए हम अपने समय में हस्तक्षेप करते हैं। सच कहने के खतरे हम उठाते हैं। उत्तरप्रदेश से लेकर दिल्ली तक में निजाम बदले मगर हमारी नीयत और सोच नहीं। हम देश, प्रदेश और दुनिया के अंतिम जन जो वंचित, उपेक्षित और शोषित है, उसकी आवाज बनने में ही अपनी सार्थकता समझते हैं। दरअसल हम सत्ता नहीं सच के साथ हैं वह सच किसी के खिलाफ ही क्यों न हो ? ✍असलम खान मुख्य संपादक

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button