मराठी

केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवलेंना बंधुशोक-प्रवीण विष्णू आठवले यांचे दुःखद निधन*

मुंबई दि. 28 – रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय
राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांचे चुलत बंधू प्रवीण विष्णू आठवले यांचे आज दि.28 जानेवारी रोजी सकाळी 9 वाजून 10 मिनिटांनी वयाच्या 41 व्या वर्षी दुःखद निधन झाले. प्रवीण विष्णू आठवले यांच्या निधनाचे वृत्त समजताच रिपाइं च्या पदाधिकाऱ्यांनी मुलुंड येथील फोरटीस रुग्णालयाकडे धाव घेतली. प्रवीण विष्णू आठवले यांच्या निधनाने रिपाइं चळवळीवर शोककळा पसरली आहे.

प्रवीण विष्णू आठवले यांचा दि. 17 जानेवारी रोजी मुलुंड येथे डोक्यावर अवजड वस्तू पडल्याने गंभीर अपघात झाला होता. त्यांनंतर प्रवीण यांना मुलुंड च्या फोरटीस रुगणलायत दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर वैद्यकीय उपचार करण्यात आले मात्र आज 10 दिवसांनी दि. 28 जानेवारी रोजी सकाळी 9 वाजून 10 मिनिटांनी प्रवीण विष्णू आठवले यांचे दुःखद निधन झाले. यांच्या पश्चात पत्नी आणि एक आठ वर्षांचा मुलगा यश आहे.
दिवंगत प्रवीण विष्णू आठवले यांचे पार्थिव राजावाडी रुग्णालय येथे शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहे. उद्या बुधवार दि. 29 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता दिवंगत प्रवीण विष्णू आठवले यांचे पार्थिव त्यांच्या राहत्या घरी लोक सह्याद्री ए सीसी रोड सिमेंट कंपनी मुलुंड पश्चिम येथे ठेवण्यात येणार असून उद्या सकाळी 11वाजता त्यांचा राहत्या घरापासून अंत्ययात्रा निघणार असून हिंदू स्मशान भूमी डम्पिंग रोड मुलुंड पश्चिम येथे दिवंगत प्रवीण विष्णू आठवले यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

 

Aslam Khan

हर बड़े सफर की शुरुआत छोटे कदम से होती है। 14 फरवरी 2004 को शुरू हुआ श्रेष्ठ भारतीय टाइम्स का सफर लगातार जारी है। हम सफलता से ज्यादा सार्थकता में विश्वास करते हैं। दिनकर ने लिखा था-'जो तटस्थ हैं समय लिखेगा उनका भी अपराध।' कबीर ने सिखाया - 'न काहू से दोस्ती, न काहू से बैर'। इन्हें ही मूलमंत्र मानते हुए हम अपने समय में हस्तक्षेप करते हैं। सच कहने के खतरे हम उठाते हैं। उत्तरप्रदेश से लेकर दिल्ली तक में निजाम बदले मगर हमारी नीयत और सोच नहीं। हम देश, प्रदेश और दुनिया के अंतिम जन जो वंचित, उपेक्षित और शोषित है, उसकी आवाज बनने में ही अपनी सार्थकता समझते हैं। दरअसल हम सत्ता नहीं सच के साथ हैं वह सच किसी के खिलाफ ही क्यों न हो ? ✍असलम खान मुख्य संपादक

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button