मराठी

केंद्रिय राज्यमंत्री मा.श्री.रामदास आठवले, यांच्या “भिम जयंती घरातच साजरी करा” आव्हानाला जनतेतून उदंड 

संवाददाता सौ.पार्वती ढोणे
केंद्रिय राज्यमंत्री मा.श्री.रामदास आठवले, यांच्या “भिम जयंती घरातच साजरी करा” आव्हानाला जनतेतून उदंड
महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी आपले संपूर्ण जीवन समतेसाठी वाहिले.त्यांनी भारताला दिलेल्या संविधानाचे सार समतेच्या तत्वात आहे.त्यामुळे समतेचे प्रज्ञासूर्य ठरलेल्या महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची जयंती यंदाच्या १४ एप्रिल ला आपल्या घरीच राहून साजरी करताना घराघरात समतेचे दिवे लावण्याचे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. श्री.रामदास आठवले यांनी ११ एप्रिल रोजी केले होते.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता यंदाची भीम जयंती घरीच राहून साजरी करावी ;कोणत्याही स्वरूपात बाहेर मनोरंजनाचे जाहीर कार्यक्रम लावून मिरवणूक काढून गर्दी जमविण्याचा प्रयत्न कोणीही करू नये. भीम जयंती दरवर्षी आपण एप्रिल ते जून महिन्या पर्यंत साजरी करीत असतो. यावर्षी कोरोनाचे जीवघेणे संकट देशावर घोंघावत असताना लॉकडाऊनचा नियम पाळणे आवश्यक आहे. त्यामुळे यंदा १४ एप्रिलला आपण घरीच राहून भीम जयंती साजरी करावी असे आवाहन ना.श्री.रामदास आठवले यांनी केले होते.
या आवहानाला अनुसरून आज भीमजयंती दिनी सकाळी सर्वांनी आपल्या घरी महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून बुद्ध वंदना घेतली,घरात गोडधोड पुरणपोळी सारखे जेवण बनवण्यात आले,तर काहींनी मिठाई देखील वाटली काल रात्री १२ वाजल्यापासून लोकांनी उत्साहात जयंती साजरी करण्यास सुरवात केली, कोणी बुद्धवंदना, पाळणा गीते, आंबेडकरी बुद्ध गीते गाऊन सकाळीच बाबासाहेबांचे प्रतिमा पूजन करून आंबेडकरी जनतेने सरकारच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करून जयंती साजरी केली.यावेळी ऊरुळी कांचन चे पोलीस उपनिरीक्षक श्री.पवन चौधरी साहेब श्री.पवार साहेब श्री.भोसले साहेब श्री.चितारे साहेब यांनी जयंती निमीत्त सोशल डिस्टन्स पाळत सर्व पोलिस अधिकारी यांनी जयंतीच्या शुभेच्छा दिल्या यावेळी पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख श्री.बापुसाहेब गायकवाड यांनी कोनीही घराबाहेर पडु नये घरातच रहा तरच आपन कोरोनाला हरवु शकतो असा संदेश दिला तसेच पुर्व हवेली अध्यक्ष श्री.नवनाथ भाऊ कांबळे यांनी कोनीही ऊपाशी पोटी राहनार नाही अशी योग्य ती काळजी घेऊ व त्यांना सर्वतोपरी मदत करु अशी आम्ही सर्व भिम सैनिक सर्वांची काळजी घेऊ यावेळी श्री.गणेश भाऊ कांबळे यांनी सर्वांना आवाहन केले की यावेळी जयंती नाचुन नाही तर बाबासाहेब आंबेडकर यांची पुस्तकें वाचुन घरातच जयंती साजरी करावी.

Aslam Khan

हर बड़े सफर की शुरुआत छोटे कदम से होती है। 14 फरवरी 2004 को शुरू हुआ श्रेष्ठ भारतीय टाइम्स का सफर लगातार जारी है। हम सफलता से ज्यादा सार्थकता में विश्वास करते हैं। दिनकर ने लिखा था-'जो तटस्थ हैं समय लिखेगा उनका भी अपराध।' कबीर ने सिखाया - 'न काहू से दोस्ती, न काहू से बैर'। इन्हें ही मूलमंत्र मानते हुए हम अपने समय में हस्तक्षेप करते हैं। सच कहने के खतरे हम उठाते हैं। उत्तरप्रदेश से लेकर दिल्ली तक में निजाम बदले मगर हमारी नीयत और सोच नहीं। हम देश, प्रदेश और दुनिया के अंतिम जन जो वंचित, उपेक्षित और शोषित है, उसकी आवाज बनने में ही अपनी सार्थकता समझते हैं। दरअसल हम सत्ता नहीं सच के साथ हैं वह सच किसी के खिलाफ ही क्यों न हो ? ✍असलम खान मुख्य संपादक

Related Articles

Back to top button