मराठी
अनधिकृत होर्डिंग पॉलिसीमुळे “चोर” अस्वस्थ झाले; भाजपा सभापतींना अडकण्याचा डाव रचला

संवाददाता, तानाजी केदारी, महाराष्ट्र राज्य प्रमुख.
दिनांक,२७-८-२०२१.
पिंपरी, चिंचवड – भारतीय जनता पार्टी सत्तेत आल्यानंतर पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाने होर्डिंग पॉलिसी जाहीर केली. त्यामुळे होर्डिंग माफीया असलेले “चोर” अस्वस्थ झाले. प्रशासनाने अनधिकृत होर्डिंग हटवण्याची नोटीस काढली आणि राजकीय डाव शिजला. महाविकास आघाडीतील नेत्यांना हाताशी धरून प्रशासन आणि सत्ताधारी लोकप्रतिनिधींचा “बंदोबस्त” करण्यासाठी यंत्रणा कामाला लावण्यात आली. स्थायी समिती सभापती नितीन लांडगे, यांच्यासह सर्व १६ .सदस्यांचे राजकीय भवितव्य संकटात आले, अशी चर्चा पिंपरी-चिंचवडच्या राजकीय वर्तुळात सुरू आहे.