मराठी
खेड शिरोली येथे दोन गाई चोरांना अटक

संवाददाता,तानाजी केदारी, महाराष्ट्र राज्य प्रमुख.
दिनांक,२-८-२०२१.
शिरोली, येथे स्थानिक शेतकऱ्यां च्या व सामाजिक संस्थाच्या कार्य कार्यकर्त्याच्या सतर्कतेमुळे शेतकरी विजय गोपाळ पवळे, यांच्या शेतात बांधलेल्या दोन गाई चोरुन नेत असताना दोघांना पकडण्यात आले. दिलीप सोपान गावडे,राहाणार धानोरे, आणि सोमनाथ शिवाजी चौधरी, राहाणार मरकळ यांना पकडून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले खेड पोलिसांनी गूरे चोरणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल करून अटक केली आहे.