मराठी

ट्रक ड्रायव्हर चा मुलगा ते थेट विधानसभेचा उमेदवार* – *प्रसाद खामकर*

*पारनेर* – निवडणूका या नशीब आजमावण्याचा एक प्रकार आहे यामध्ये कोणाचे नशीब कधी उघडेल हे सांगता येणार नाही. पारनेर तालुक्यातील हंगा येथील असाच एक युवक प्रसाद खामकर ,महाविद्यालयीन शिक्षण घेताना अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत काम करायला लागला आणि आज जनता पार्टीच्या तिकिटावर पारनेर नगर विधानसभा निवडणूक लढवत आहे.

पारनेर तालुक्याचा भाग प्रामुख्याने शिक्षण आणि सैनिकांचा आणि कामगाराचा भाग म्हणून ओळखला जातो.हंगा हे पारनेर सुपा रस्त्यालगत असलेले गाव ही त्याला अपवाद नाही.याच गावातील बापू आणि लक्ष्मी खामकर यांचा प्रसाद हा धाकटा मुलगा.प्रसाद दोन बहिणी,दोघींचे विवाह झालेले.एकुलता मुलगा असलेल्या प्रसाद खामकर यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे पदाधिकारी म्हणून काम केले आहे.घरची परिस्थिती गरिबीची असल्याने आणि परंपरागत व्यवसायातून आणि कोरडवाहू शेतीतून फारसे उत्पन्न मिळत नसल्याने बापू खामकर यांनी चालक म्हणून तर आणि लक्ष्मी खामकर यांनी गृहिणी बनून घर संभाळले व शेतात काम केले.याच तालुक्याच्या मतदारसंघाची निवडणूक आपला मुलगा कधी लढवू शकेल हे त्यांच्या स्वप्नात ही नव्हते.

आता ते राज्यातील जनता पार्टी पक्षाचे उमेदवार आहेत.प्रसाद खामकर यांच्या हंगा येथील घरी भेट दिली तेव्हा त्यांच्या आई लक्ष्मी घरी होत्या.त्यांनी सांगितले की , प्रसाद हा पूर्वी पासून खूप कष्टाळू.कॉलेजच्या शिक्षणासाठी पारनेर ला होता .शिक्षण पूर्ण केल्यावर राजकारणात जाणार असल्याचे सांगितले.आम्ही त्याला विरोध केला नाही.आता तो आमदार होण्यासाठी निवडणूक लढवणार आहे.आमदाराने काय काम करायचं असतं ते मला माहित नाही पण एवढं लोक त्याच कौतुक करताहेत म्हणजे नक्कीच मोठं काम असणार आहे.आम्ही त्यामुळे खूप आनंदित आहोत.

Aslam Khan

हर बड़े सफर की शुरुआत छोटे कदम से होती है। 14 फरवरी 2004 को शुरू हुआ श्रेष्ठ भारतीय टाइम्स का सफर लगातार जारी है। हम सफलता से ज्यादा सार्थकता में विश्वास करते हैं। दिनकर ने लिखा था-'जो तटस्थ हैं समय लिखेगा उनका भी अपराध।' कबीर ने सिखाया - 'न काहू से दोस्ती, न काहू से बैर'। इन्हें ही मूलमंत्र मानते हुए हम अपने समय में हस्तक्षेप करते हैं। सच कहने के खतरे हम उठाते हैं। उत्तरप्रदेश से लेकर दिल्ली तक में निजाम बदले मगर हमारी नीयत और सोच नहीं। हम देश, प्रदेश और दुनिया के अंतिम जन जो वंचित, उपेक्षित और शोषित है, उसकी आवाज बनने में ही अपनी सार्थकता समझते हैं। दरअसल हम सत्ता नहीं सच के साथ हैं वह सच किसी के खिलाफ ही क्यों न हो ? ✍असलम खान मुख्य संपादक

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button