आयपीएलचं ठिकाण ठरलं , उर्वरीत सामने होणारच , BCCI चा मोठा निर्णय*

संवाददाता, पार्वती ढोणे, महाराष्ट्र राज्य प्रभारी.
दिनांक,३०-५-२०२१. कोरोनामुळे स्थगित झालेल्या इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएलबाबत भारतीय क्रिकेट नियामक मंडळ BCCI ने मोठा निर्णय घेतला आहे. आयपीएलचे उर्वरित सामने आता संयुक्त अरब अमिराती म्हणजेच यूएईमध्ये होणार आहेत. बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी याबाबतची माहिती दिली.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) आज विशेष कार्यकारिणीचं (Special Genral Meeting) आयोजन केलं होतं. या बैठकीकडे क्रिकेटप्रेमींचं लक्ष लागलं होतं. कोरोनाच्या संकटामुळे स्थगित झालेल्या इंडियन प्रिमीयर लीगचे (IPL 2021) उर्वरीत सामने कधी होणार?
मात्र कोरोनाची दुसरी लाट आल्याने ऐन रंगात आलेली आयपीएल स्पर्धा 4 मे रोजी स्थगित करण्यात आली होती.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) आज विशेष कार्यकारिणीचं (Special Genral Meeting) आयोजन केलं होतं. या बैठकीकडे क्रिकेटप्रेमींचं लक्ष लागलं होतं. कोरोनाच्या संकटामुळे स्थगित झालेल्या इंडियन प्रिमीयर लीगचे (IPL 2021) उर्वरीत सामने कधी होणार? याची उत्सुकता होती. अखेर BCCI ने हे सामने यूएईला होणार असल्याचं स्पष्ट केलं.