पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील निमशासकीय व खाजगी शाळांचे शास्तीकर माफ करण्याबाबत आज श्री. राजेश पाटिल, साहेब ह्यांना निवेदन -श्री. भाग्यदेव घुले

संवाददाता, तानाजी केदारी, महाराष्ट्र राज्य प्रमुख.
दिनांक,२०.१०.२०२१
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील कोविड-१९ च्या प्रादुर्भावामुळे गेले दीड वर्ष झाले शाळा कॉलेजेस बंद आहे,त्यामुळे शाळे वरती शास्ती करांचा बोजा वाढला आहे…
माझी अशी नम्र विनंती आहे की पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील खाजगी शाळेचा शास्तीकर माफ करावा किंवा कमी करावा जेणेकरून विद्यार्थ्यांना फी मध्ये सवलत मिळेल व शाळेचा तगदा लावला जाणार नाही. विद्यार्थ्यांनला महानगरपालिकेच्या परिसरामध्ये प्रत्येक गावात दोन तरी खाजगी शाळा आहेत त्यामुळे गरजू विद्यार्थ्यांना महत्त्व देऊन शाळेतील फी माफी साठी प्रयत्न केले तर शाळेच्या शास्ती कराचा विषय व शाळेचा मेंटेनन्स पगार इ विषय पुढे येतो म्हणून माझे माननीय आयुक्त साहेब आपणास नम्र विनंती आहे की पिंपरी-चिंचवड मध्ये खाजगी शाळा आहेत त्यांचा जर शास्तीकर कमी केला निश्चितच विद्यार्थ्यांच्या फी मध्ये व सोयी सुविधा मध्ये व शिक्षणाच्या दर्जा मध्ये फरक पडेल,अशी विनंती श्री.भाग्योदय घुले.यांच्या वतीने करण्यात आली…