मराठी

पोलिस खात्यातील आधिकारी व कर्मचारी यांच्या जाचास कंटाळुन हावालदारने केली आत्महत्त्या

अहमद नगर प्रतिनिधीं. … मुळा धरणावर ‘बंदोबस्ता वर असणारे पोलिस हवालदार भाऊसाहेब दगडु आघावं वय ५२ यांनी स्वतः जवळ धरण सुरक्षे साठीअसलेल्या पोलिस खात्याच्या बंदुकीमधून गोळी झाडून घेतली आहे. यात त्यांचा मृत्यू झाला आहे. हे कळताच नेमका हा प्रकार कशातून झाला, हे सत्य समजुन घेण्यासाठी राहुरीचे पोलिस निरीक्षक प्रताप दराडे व धरण अभियंता शरद कांबळे व सहकारी घटना थळी दाखल झाले असता चैकीचा दरवाजा आतून बंद होता . दरवाजा ताडून आत प्रवेश केला असता आघाव हे मुत्यु झाले होते. हा प्रकार कशातुन झाला हे शोधण्या साठी पो नि दराडे यांनी आधीक तपासनी केली असतां . त्यांनां मुत्यु देहाजवळ आघाव यानी लिहून ठेवलेली चिठठीआढळुन आली.
या चिठ्ठीतून पाेलिस दलात सुरू असलेल्या आर्थिक देवाणघेवाणीचा प्रकार उघडकीस आला आहे. यामुळे अहमदनगर जिल्हा पाेलिस दलात आर्थिक देवाणघेवाणींच्या प्रकाराला उधाण आलं अकोले तालुक्यातील राजूर पोलिस ठाण्यात नियुक्ती असताना सहकारी महिला कर्मचाऱ्याचा विनयभंग केल्याचा गुन्हा हवालदार भाऊसाहेब दगडु आघाव वय ५२ रा. बारागांव नांदुर ता राहुरी यांच्याविरूद्ध मागील वर्षी दाखल झाला होता. त्यांनी आज मुळा धरणावर बंदोबस्तावर असताना गोळी झाडून घेतली. त्यापूर्वी आघाव यांनी चिठ्ठी लिहून ठेवली हाेती. यात गुन्हा आणि चौकशीचं प्रकरण मिटविण्यासाठी दहा लाख रुपयांची मागणी होत असल्याचं समाेर येत आहे. या चिठ्ठीनुसार
भाऊसाहेबआघावा राजूर पोलिस ठाण्यात असताना जून २०२१ मध्ये त्यांच्याविरूद्ध एका महिला पोलिस कर्मचाऱ्याचा विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर त्यांची अहमदनगरच्या मुख्यालयात बदली झाली असून प्रकरणाची चौकशी सुरू हाेती.

या घटनेचा संदर्भ देत आघावा यांनी चिठ्ठीत दिला आहे. ‘बंदोबस्ताच्या कामासाठी आपण अकोले इथं गेलो असता तिथं राजूर पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक साबळे भेटले. त्यांनी सांगितलं की, तुम्ही शेंडी येथे नियुक्तीला असताना अवैध धंदे बंद केल्यानं पाच लाखांचं नुकसान झालं. त्यानंतर मी हवालदार निमसे यांना हाताशी धरून तुमच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला. तेव्हापासून माझे पैसे सुरू झाले. या गुन्ह्यातून आणि चौकशीतून सुटायचे असेल तर दहा लाख रुपये द्या. यात माझा, निमसे तसेच फिर्याद देणारी महिला कर्मचारी आणि चौकशीचं काम पहणारे फुंदे भाऊसाहेब यांचा वाटा आहे, असं साबळे यांनी सांगितलं. मात्र, आपल्याकडे एवढे पैसे नाहीत, असे सांगून आपण ते टाळले.

काही दिवसांनी चौकशी करणाऱ्या फुंदे यांचा फोन आला. त्यांनी सांगितलं की यातून सुटायचे असेल तर साबळे सांगतात, तसे करा अन्यथा परिणाम भोगा. त्यानंतर मला पोलिस अधीक्षकांकडे चौकशी कक्षासाठी बोलावण्यात आलं. त्यावेळी आपण पोलिस अधीक्षकांना सर्व हकिगत सांगितली. त्यावर त्यांनी काहीही प्रतिक्रिया दिली नाही. त्यामुळे मी पूर्णपणे हतबल झालो असून स्वत:ला संपवत आहे,’ असं आघाव यांनी चिठ्ठीत म्हटलं आहे.चिठ्ठी चा संदर्भ घेत एक पोलिस अधिकारी व दोन कर्मचारी यांचे वर आघाव यांना आत्महत्येस कारणीभुत केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करणें चे काम उशिरा पर्यन्त सुरू होते . घटनेची माहिती राहुरीचे. पो नि दराडे यांनी वरीष्टांन कळविल्याचे कळताच श्रीरामाचे डी वाय एस पी संदिप मिटके व अहमदनगरचे पोलिस अधीक्षक मनोज पाटील घटना स्थळी हजर झाले. त्यांनी घटनेची माहिती घेत राहुरीचे पो नि दराडे यांना करवाईचे आदेश दिले.

Aslam Khan

हर बड़े सफर की शुरुआत छोटे कदम से होती है। 14 फरवरी 2004 को शुरू हुआ श्रेष्ठ भारतीय टाइम्स का सफर लगातार जारी है। हम सफलता से ज्यादा सार्थकता में विश्वास करते हैं। दिनकर ने लिखा था-'जो तटस्थ हैं समय लिखेगा उनका भी अपराध।' कबीर ने सिखाया - 'न काहू से दोस्ती, न काहू से बैर'। इन्हें ही मूलमंत्र मानते हुए हम अपने समय में हस्तक्षेप करते हैं। सच कहने के खतरे हम उठाते हैं। उत्तरप्रदेश से लेकर दिल्ली तक में निजाम बदले मगर हमारी नीयत और सोच नहीं। हम देश, प्रदेश और दुनिया के अंतिम जन जो वंचित, उपेक्षित और शोषित है, उसकी आवाज बनने में ही अपनी सार्थकता समझते हैं। दरअसल हम सत्ता नहीं सच के साथ हैं वह सच किसी के खिलाफ ही क्यों न हो ? ✍असलम खान मुख्य संपादक

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button