कुत्रं धुण्याच्या नादात तीन भावंडं वाहून गेली … तिघांचाही शोध सुरु, कुत्र्याचा मृतदेह सापडला

संवाददाता, सौ. पार्वती ढोणे, महाराष्ट्र राज्य प्रभारी.
दिनांक,८-६-२०२१.

ही ह्रदयद्रावक बातमी सांगलीतून. आटपाडी तालुक्यात घानंद नावाचं गाव आहे . याच गावात तीन भावंडं ओढ्याच्या पाण्यात वाहून गेल्याची घटना घडलीय. यात दोन सख्खे भाऊ तर एक चुलत भाऊ आहे. विशेष म्हणजे ही तीनही भावंडं ओढ्यावर कुत्रं आणि मासे धुण्यासाठी गेली होती. त्यातच ती वाहून गेली.

काळीज पिळवटून टाकणाऱ्या ह्या घटनेत कुत्रंही वाहून गेलं. त्यात त्याचा मृत्यू झाला. त्याचा मृतदेह सापडला आहे. तीनही भावंडांचा मात्र अजूनही शोध सुरु आहे. रात्री उशिरापर्यंत ही शोध मोहिम सुरु होती पण फार काही हाताला लागलं नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *