पिंपरी चिंचवड शहरातील सांगवी पोलिसांची जबरदस्त कामगिरी गावठी पिस्तूल जवळ बाळगण्यास केलें गजाआड.

संवाददाता, तानाजी केदारी, महाराष्ट्र राज्य प्रमुख.
दिनांक,११-९-२०२१.
सांगवी पोलीस यांनी आरोपी मौलाली रहीम शेख वय २०. वर्ष राहणार जुनी सांगवी पुणे हा जुनी सांगवी परिसरात गावठी कट्टा घेऊन येणार असल्याची खात्रीलायक बातमी पोलीस हवालदार भिसे, व पोलीस नाईक देवकांत, यांना मिळाली असता सांगवी तपास पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश कांबळे, पोलीस हवालदार भिसे, केंगले, देवकांत, सूर्यवंशी देवकर, गुत्तीकोंडा यांनी त्यास ताब्यात घेऊन त्याच्या ताब्यातून एक गावठी कट्टा पिस्टल व दोन जिवंत काडतूस ताब्यात घेतले सदरची कारवाई माननीय पोलीस आयुक्त सो. श्रीकृष्ण प्रकाश,सो. पिंपरी चिंचवड माननीय पोलीस उपायुक्त सो श्री. आनंद भोईटे, परिमंडळ २. माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त श्री.श्रीकांत डिसले वाकड विभाग व वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील टोंणपे सांगवी पोलीस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली सांगवी पोलीस ठाणे कडील तपास पथकाने सदरची कारवाई केली.