मराठी

रेमडेसिवीर इंजेक्शनच्या तुटवड्याची समस्या तीन दिवसांत संपेल !* *आमदार महेश (दादा) लांडगे

संवाददाता, तानाजी केदारी, महाराष्ट्र राज्य प्रमुख.
दिनांक, २१-५-२०२१.

पिंपरी-चिंचवड शहरात रेमडेसिवीर इंजेक्शनचा व कोविड-१९.प्रतिबंधात्मक लसीचा तुटवडा भासत आहे. यासाठी शासनस्तरावर व महापालिका स्तरावर पाठपुरावा केला जात आहे. हा प्रश्‍न तीन दिवसांत संपेल, अशी भूमिका महापालिकेचे अतिरिक्‍त आयुक्‍त विकास ढाकणे यांनी मांडली.

महापालिका असली तरी शासनाचे आम्हाला आदेश असतात. शासनाच्या आदेशानंतर आम्ही काम करतो. लवकरच या अडचणींवर मात करू, असे देखील ते म्हणाले.
पिंपरी-चिंचवडमधील डॉक्टर असोसिएशनचे पदाधिकारी, महापालिका अधिकारी यांची कोविड महामारीच्या काळात डॉक्टरांना सामाना कराव्या लागणाऱ्या समस्यांबाबत भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांच्या उपस्थितमध्ये बैठक घेण्यात आली.

यावेळी पिंपरी-चिंचवड महापालिका अधिकारी व हॉस्पीटल ओनर असोसिएशचे पदाधिकारी, डॉक्टर, हॉस्पीटल ओनर असोसिएशनचे सचिव डॉ. प्रमोद कुबडे, डॉ. गणेश भोईर उपस्थित होते.

अतिरिक्‍त आयुक्‍त ढाकणे म्हणाले की, कोविड काळात येणार्‍या अडचणींमुळे व काळजीने आम्ही प्रामाणिक प्रयत्न करीत आहोत. गॅस पुरविणार्‍यांनी अचानक अडचणींमुळे गॅस देणार नसल्याचे सांगितले. त्याबाबत शासकीय पातळीवर बैठका सुरु आहेत. संख्या वाढायला लागल्यानंतर काही कंपन्यांकडून लस बनविण्यास सुरूवात केली. हाफकिन कंपनीसोबत चर्चा करत आहे. महापालिकेकडे २.हजार ५००.रुग्ण असताना १.हजार ५००.रेमडिसीव्हरची इंजेक्शन येत आहे. त्यामुळे वैद्यकीय विभागाची देखील कसरत होत आहे.

Aslam Khan

हर बड़े सफर की शुरुआत छोटे कदम से होती है। 14 फरवरी 2004 को शुरू हुआ श्रेष्ठ भारतीय टाइम्स का सफर लगातार जारी है। हम सफलता से ज्यादा सार्थकता में विश्वास करते हैं। दिनकर ने लिखा था-'जो तटस्थ हैं समय लिखेगा उनका भी अपराध।' कबीर ने सिखाया - 'न काहू से दोस्ती, न काहू से बैर'। इन्हें ही मूलमंत्र मानते हुए हम अपने समय में हस्तक्षेप करते हैं। सच कहने के खतरे हम उठाते हैं। उत्तरप्रदेश से लेकर दिल्ली तक में निजाम बदले मगर हमारी नीयत और सोच नहीं। हम देश, प्रदेश और दुनिया के अंतिम जन जो वंचित, उपेक्षित और शोषित है, उसकी आवाज बनने में ही अपनी सार्थकता समझते हैं। दरअसल हम सत्ता नहीं सच के साथ हैं वह सच किसी के खिलाफ ही क्यों न हो ? ✍असलम खान मुख्य संपादक

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button