भगवा ध्वज हा पवारांचा नाही आणि कोणा एकट्याच पण नाही तो सर्वांचा आहे. शिवसेनेचे माजी खासदार अनंत गीते,यांना सणसणीत उत्तर आमदार रोहित पवार /राष्ट्रवादी काँग्रेस कर्जत जामखेड

संवाददाता, तानाजी केदारी, महाराष्ट्र राज्य प्रमुख.
दिनांक,२३.९.२०२१.
कर्जत जामखेड चे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार,यांनी अयोध्या मध्ये भगवा ध्वजाची प्रतिमा असलेले सन्मानचिन्ह हनुमान गढी ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते घेऊन दाखल झाले, आणि एक प्रकारे आमदार रोहित पवारांनी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते अनंत गीते, यांना सणसणीत उत्तर दिले विषय पण तितकाच महत्त्वाचा आहे कारण शिवसेनेचे ज्येष्ठ नेते माजी खासदार अनंत गिते,यांनी आपल्या भाषणात राष्ट्रवादीचे काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार, यांच्या विषयी वक्तव्य करून खळबळ उडवून दिली होती. शिवसेनेचे माजी खासदार अनंत गिते, म्हणाले होते की. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, हे आमचे नेते नाही त्यांनी काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसून राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली, त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक भूमिका घेत आपला निषेध व्यक्त करीत होते.