दारूच्या अड्ड्यावर कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांवर जमावाचा हल्ला , पोलीस निरीक्षक गंभीर जखमी नेमकं काय घडलं

संवाददाता, तानाजी केदारी, महाराष्ट्र राज्य प्रमुख.
दिनांक,३०-५-२०२१.
माळशिरस तालुक्यातील वेळापूर येथे अवैध हातभट्टी चालवणाऱ्या दारुच्या अड्ड्यावर कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांवर जमावाने प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या हल्ल्यात वेळापूर पोलीस ठाण्याचे स्वत: पोलीस निरीक्षक भगवान खारतोडे आणि पोलीस कॉन्स्टेबल विठ्ठल बंदुके हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पण या घटनेने संपूर्ण शहर हादरलं आहे.
वेळापूर येथील पालखी चौक येथून काही अंतरावर पारधी समाजाची वस्ती आहे. तिथे अवैध हातभट्टी दारुचा अड्डा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. विशेष म्हणजे ही हातभट्टी गेल्या कित्येक दिवसांपासून सुरु आहे. मात्र, पोलिसांनी आतापर्यंत तिथे फारशी मोठी कारवाई केली नव्हती. दरम्यान, पोलीस आज (२८.मे) संध्याकाळी पारधी वस्तीत गेले. तिथे त्यांनी कारवाई करण्यास सुरुवात केली. काही लोकांची चौकशी केली. मात्र, यावेळी मोठा गदारोळ झाल
पारधी वस्तीमध्ये २० ते २५महिला आणि पुरुषांनी मिळून थेट पोलिसांवरच हल्ला केला. यावेळी पोलिसांनी जमावाला प्रतिकार करण्याचा सर्वोतोपरी प्रयत्न केला. मात्र, जमावावर ताबा मिळवणं हे पोलिसांच्या अवाक्याबाहेर होतं. या गदारोळात दोन पोलीस गंभीर जखमी झाले. तर एक पोलीस कर्मचारी किरकोळ जखमी झाला.