मराठी

पिंपरी चिंचवड* *लग्नाचे आमिष ५०.हून अधिक महिलांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक

संवाददाता, तानाजी केदारी, महाराष्ट्र राज्य प्रमुख.
दिनांक,२५.९.२०२१.
पिंपरी : लग्नाचे आमिष दाखवून तब्बल ५०. हून अधिक महिलांना आपल्या जाळ्यात ओढून त्यांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या ‘लखोबा लोखंडे’ला पिंपरी-चिंचवड पोलिसांनी अखेर बेड्या घातल्या आहेत. प्रेमराज थेवराज डिक्रुज, असं या व्यक्तीचं नाव असून तो मुळचा चेन्नईचा आहे. अटक केल्यानंतर या ३०.वर्षाच्या प्रेमराजचा हा प्रताप ऐकून पोलिसांनीही कपाळावर हात मारुन घेतला.

अगदी एखाद्या चित्रपटाची कहाणी शोभेल अशा पद्धतीने या प्रेमराजने अनेक महिलांना आपल्या जाळ्यात ओढलं. आपण मोठा उद्योगपती असल्याच्या बतावण्या करुन त्याने अनेक महिलांचा विश्वास संपादन केला. अनेकींनी त्याने आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढलं आणि साखरपूडाही केला. त्यानंतर त्याने तो संबंधित महिलांकडून लाखो रुपये उकळायचा.

प्रेमराज थेवराज डिक्रुज,या व्यक्तीविरोधात पिंपरी चिंचवड पोलीस स्टेशनमध्ये एका महिलेने फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.
आतापर्यंत पुणे, ठाणे, मुंबई, चेन्नई, गांधीनगर, सुरत, अशा अनेक शहरातील महिलांना आपल्या जाळ्यात ओढलं आहे. पोलीस आता या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Aslam Khan

हर बड़े सफर की शुरुआत छोटे कदम से होती है। 14 फरवरी 2004 को शुरू हुआ श्रेष्ठ भारतीय टाइम्स का सफर लगातार जारी है। हम सफलता से ज्यादा सार्थकता में विश्वास करते हैं। दिनकर ने लिखा था-'जो तटस्थ हैं समय लिखेगा उनका भी अपराध।' कबीर ने सिखाया - 'न काहू से दोस्ती, न काहू से बैर'। इन्हें ही मूलमंत्र मानते हुए हम अपने समय में हस्तक्षेप करते हैं। सच कहने के खतरे हम उठाते हैं। उत्तरप्रदेश से लेकर दिल्ली तक में निजाम बदले मगर हमारी नीयत और सोच नहीं। हम देश, प्रदेश और दुनिया के अंतिम जन जो वंचित, उपेक्षित और शोषित है, उसकी आवाज बनने में ही अपनी सार्थकता समझते हैं। दरअसल हम सत्ता नहीं सच के साथ हैं वह सच किसी के खिलाफ ही क्यों न हो ? ✍असलम खान मुख्य संपादक

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button