सरकारने खर तर मोफत लस देणं गरजेचं -प्रकाश आंबेडकर

संवाददाता, तानाजी केदारी, महाराष्ट्र राज्य प्रमुख.
दिनांक, २७-४-२०२१.
पुणे | लसीबाबत भारताने लवकर निर्णय घ्यावा. लसीचे उत्पादन आपल्याकडे होत आहे. तरी लस आपल्याकडे महाग कशी?, सगळ्यांना १५०.रुपयात लस द्या?, १.मे पासून १८.वर्षांवरील सर्वांना लस देण्यात येणार आहे. पण त्यासाठी जाहीर केलेले दर हे सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर आहेत. सरकारने खर तर मोफत लस देणं गरजेचं आहे. त्या दराबाबतलसींच्या दराबाबत पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री गप्प का आहेत, असा, सवाल प्रकाश आंबेडकर,यांनी केला आहे.पंतप्रधान निधीमध्ये किती निधी आला याची याचिका सर्वोच्च न्यायालयाने स्वीकारली नाही. माझ्या माहिती प्रमाणे हजार कोटींपेक्षा अधिक पैसे आले. काल पंतप्रधान मोदी, यांनी या निधीचा वापर करू. असं सांगितल्यावर भाजपवाले त्यांची पाठ थोपटत आहेत. पंतप्रधानांच प्राधान्य बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांना हरवणं होतं, असं म्हणत आंबेडकरांनी मोदींवर निशाणा साधला.कोरोनाच्या दुसऱ्या महामारीमुळे देशात सध्या हैदोस घातला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सरकारने लसीकरणावर भर द्यायला सुरूवात केली आहे. १.मे पासून १८.वर्षांवरील सर्वांना लस देण्यात येणार आहे. पण या लसीचे दर जे ठरवण्यात आले आहेत.