मराठी

पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाने धुमाकूळ, ऑक्सिजनचा प्रचंड तुटवडा

संवाददाता, तानाजी केदारी, महाराष्ट्र राज्य प्रमुख.
दिनांक.२३-४-२०२१.

ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे अनेक रुग्णांचे जीव धोक्यात
: पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाने अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. या शहरात रोज दोन ते तीन हजार इतक्या पटीने कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत आहेत. त्याचाच परिणाम म्हणून शहरातील खाजगी रुग्णालयात ऑक्सिजनचा तुटवडा मोठ्या प्रमाणात जाणवू लागला आहे. पुणे, पिंपरी-चिंचवडसह अहमदनगरमध्ये आज रात्रभर पुरेल एवढाच ऑक्सिजनचा साठा शिल्लक आहे. त्यामुळे खाजगी रुग्णालयासमोर मोठे संकट उभे राहिले आहे. राज्यात होत आहेकोरोना रुग्णांच्या संख्येत कमालीची वाढ. तर दुसरीकडे पुणे, पिंपरी-चिंचवड, अहमदनगर या ठिकाणी ऑक्सिजनचा प्रचंड तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे या तिन्ही ठिकाणच्या कोरोना रुग्णांचा श्वास गुदमरला आहे. तसेच या ठिकाणी ऑक्सिजनचा खूप कमी साठा शिल्लक असल्याने खासगी रुग्णालयांना ऑक्सिजन मिळत नसल्याचेही बोललं जात आहे.

पिंपरी चिंचवड शहरात शंभरपेक्षा अधिक खाजगी कोविड रुग्णालय आहेत. त्यामध्ये साधारणपणे २३००.रुग्णांना ऑक्सिजनची गरज आहे. मात्र काल दुपारपासून या ठिकाणी ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे अनेक रुग्णांचे जीव धोक्यात आले आहे. पुणे अन्न आणि औषध प्रशासनाकडे याबाबत वारंवार संपर्क करुनसुद्धा ते याकडे गांभीर्याने पाहत नसल्याचा आरोप भाजप आमदार महेश लांडगे यांनी केला आहे.

Aslam Khan

हर बड़े सफर की शुरुआत छोटे कदम से होती है। 14 फरवरी 2004 को शुरू हुआ श्रेष्ठ भारतीय टाइम्स का सफर लगातार जारी है। हम सफलता से ज्यादा सार्थकता में विश्वास करते हैं। दिनकर ने लिखा था-'जो तटस्थ हैं समय लिखेगा उनका भी अपराध।' कबीर ने सिखाया - 'न काहू से दोस्ती, न काहू से बैर'। इन्हें ही मूलमंत्र मानते हुए हम अपने समय में हस्तक्षेप करते हैं। सच कहने के खतरे हम उठाते हैं। उत्तरप्रदेश से लेकर दिल्ली तक में निजाम बदले मगर हमारी नीयत और सोच नहीं। हम देश, प्रदेश और दुनिया के अंतिम जन जो वंचित, उपेक्षित और शोषित है, उसकी आवाज बनने में ही अपनी सार्थकता समझते हैं। दरअसल हम सत्ता नहीं सच के साथ हैं वह सच किसी के खिलाफ ही क्यों न हो ? ✍असलम खान मुख्य संपादक

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button