केंद्र सरकारने खाद्यतेलाच्या आयात शुल्कात पाच टक्के कपातीचा घेतला निर्णय
संवाददाता,सौ.पार्वती ढोणे, महाराष्ट्र राज्य प्रभारी.
दिनांक,१४-९-२०२१. खाद्यतेलाचे भावात नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकारने आयात शुल्कात पाच टक्के कपातीचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे क्रूड पामोलीन, कच्च्या सोयाबीन तेलावरील आयात शुल्क आता ३०.२५. टक्क्यांवरून २४.७५.टक्के, सूर्यफूल आणि पक्क्या सोयाबीन तेलावरील आयात शुल्क ४१.२५. टक्क्यांवरून ३५.७५.टक्के होणार आहे.
आयात शुल्कात पाच टक्के कपातीच्या निर्णयामुळे शेतमालाच्या भावाला फटका बसण्याची भीती व्यक्त होत आहे. या निर्णयामुळे क्रूड पामोलीनच्या एका किलोमागे ४. रुपये १८.पैसे, पामतेल ४.रुपये ३२. पैसे व पक्के सोयाबीन ४. रुपये ९९. पैशाने कमी होणे अपेक्षित आहे. सोयाबीन बाजारपेठेतील भावावर याचा १००.रुपये क्विंटलमागे फरक होणे अपेक्षित असून सोयाबीनचे भाव १०. हजार रुपये प्रतिक्विंटलपर्यंत चढे होते, ते आता घसरत महाराष्ट्रात आठ हजार प्रति क्विंटल आहेत.