*राजमाता जिजाऊ माॅसाहेब यांची जयंती साजरी करण्यात आली.*
संवाददाता,सौ.पार्वती ढोणे, महाराष्ट्र राज्य प्रभारी.
दिनांक.१२.१.२०२२.
राजमाता जिजाऊ माँसाहेब यांना आज जयंतीनिमित्त लालमहल येथे समस्त पुणेकरांच्या वतीने पुण्यनगरीचे महापौर मा.मुरलीधर मोहोळ, व पुण्यनगरीच्या उपमहापौर सौ.सुनिताताई परशुराम वाडेकर,यांच्या शुभहस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
याप्रसंगी अनेक मान्यवर सभासद नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. राजमाता जिजाऊ माँसाहेबांची शिकवण आजही आपल्या सर्वांना : प्रेरणादायी आणि लढण्याची ताकद देणारी आहे.