रुग्णालयात बेडसाठी एक लाख रुपये घेणारांवर फौजदारी कारवाई करा…..अॅड. सचिन भोसले

संवाददाता, तानाजी केदारी, महाराष्ट्र राज्य प्रमुख,
दिनांक, ४-५-२०२१.
पिंपरीमध्ये ऑटोक्लस्टर येथील रुग्णालयाचा सर्व खर्च पिंपरी चिंचवड मनपा करते. त्याचे व्यवस्थापन ‘स्पर्श’ संस्थेकडे आहे. या व्यस्थापनाबाबत वारंवार अनेक तक्रारी येत आहेत. मागील दोन दिवसांपुर्वी एका महिला रुग्णाच्या नातेवाईकांकडून ऑटोक्लस्टर मध्ये बेड मिळवून देण्यासाठी एक लाख रुपये घेतल्याचा आरोप महिलेच्या नातेवाईकांनी केला आहे. या घटनेत दोषी असणा-यांवर फौजदारी कारवाई करावी अशी मागणी शिवसेना शहर प्रमुख ॲड. सचिन भोसले यांनी केली आहे. रविवारी (दि. 2 मे) ॲड. भोसले, यांची गुगल मीटव्दारे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी त्यांनी सांगितले की, ‘स्पर्श’ व्यवस्थापनाबाबत शिवसेना मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, यांच्याकडे तक्रार करणार आहे. तसेच शनिवारी पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्त कृष्णप्रकाश, यांच्याकडे याबाबत तक्रार अर्ज दिला आहे.