मराठी

पुणे पोलीस आयुक्तालयाच्या दारात पेटवून घेतलेल्या सुरेश पिंगळेंचा मृत्यू

संवाददाता, तानाजी केदारी, महाराष्ट्र राज्य प्रमुख.
दिनांक,२१-८-२०२१.
केवळ पोलीस व्हेरिफिकेशन होत नाही या कारणाने सुरेश पिंगळे, यांनी पुणे पोलीस आयुक्तालयाच्या गेटसमोर स्वत: ला काल पेटवून घेतलं होतं. दोन अडीच महिने ते खडकी पोलीस ठाणे, तसेच पोलीस आयुक्तालयात हेलफाटे मारत होते. मात्र कुठलंतरी कारण सांगून त्यांचं व्हेरिफिकेशन केलं जात नव्हतं. त्यामुळे ते वैतागले होते. अखेर त्यांनी संतापात स्वत:ला पेटवून घेऊन आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. उपचारादम्यान त्यांचा मृत्यू झाला.

पिंगळे पाषाण येथील एआरडीई येथे कंत्राटी पद्धतीने ऑफिस बॉयचं काम करायचे. त्यांचा दरवर्षी कॉन्ट्रॅक्ट बदलायचा. तिथे दरवर्षी पोलीस व्हेरिफिकेशन लागायचं. आतापर्यंत दरवर्षी पोलीस व्हेरिफिकेश लागत होतं. दरवर्षी ते मिळत होतं. पण यावेळी त्यांना अडचण आली. पुणे पोलीस आयुक्तालयाच्या दारात स्वत:ला जाळून घेऊन आत्मदहन करण्याचा प्रयत्न करणारे सुरेश पिंगळे,यांची प्राणज्योत मालवली आहे.

त्यांच्यावर पुण्यातील सूर्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. पण ते जवळपास ८०. टक्के भाजले असल्याने त्यांचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाला. सुरेश यांनी चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र बनवण्यासाठी हे टोकाचं पाऊल उचललं होतं. त्यांच्या कामासाठी टाळाटाळ होत असल्याने त्यांनी हे टोकाचं पाऊल उचलल्याची माहिती समोर आली आहे.

या घटनेमुळे पुणे पोलिसांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.या घटनेनंतर पिंगळे यांचे कुटुंबिय आक्रमक झाले आहेत. पोलिसांकडून जोपर्यंत आपल्या जबाबादारीची हमी देत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका पिंगळे यांच्या पत्नीने घेतली आहे. या घटनेनंतर पिंगळे यांच्या कुटुंबियांनी रुग्णालयाबाहेर गर्दी केली आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर रुग्णालयाबाहेर पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.

“मला न्याय हवाय. माझ्या मुलांचं मी काय करु. मला नोकरी नाही. एकतर मला नोकरीला लावावं. मला नोकरी लागली तर मुलांचं पोट भरेल. कारण नोकरीसाठीच त्यांनी आत्मदहन केलं आहे. पोलीस अधिकारी याबाबत लेखी स्वरुपात सांगत असतील आम्ही मृतदेह ताब्यात घेऊ”, असं पिंगळे, यांच्या पत्नीने सांगितलं आहे.

Aslam Khan

हर बड़े सफर की शुरुआत छोटे कदम से होती है। 14 फरवरी 2004 को शुरू हुआ श्रेष्ठ भारतीय टाइम्स का सफर लगातार जारी है। हम सफलता से ज्यादा सार्थकता में विश्वास करते हैं। दिनकर ने लिखा था-'जो तटस्थ हैं समय लिखेगा उनका भी अपराध।' कबीर ने सिखाया - 'न काहू से दोस्ती, न काहू से बैर'। इन्हें ही मूलमंत्र मानते हुए हम अपने समय में हस्तक्षेप करते हैं। सच कहने के खतरे हम उठाते हैं। उत्तरप्रदेश से लेकर दिल्ली तक में निजाम बदले मगर हमारी नीयत और सोच नहीं। हम देश, प्रदेश और दुनिया के अंतिम जन जो वंचित, उपेक्षित और शोषित है, उसकी आवाज बनने में ही अपनी सार्थकता समझते हैं। दरअसल हम सत्ता नहीं सच के साथ हैं वह सच किसी के खिलाफ ही क्यों न हो ? ✍असलम खान मुख्य संपादक

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button