मराठी

सुनेने ब्लाउजने गळा आवळून केला सासूचा खून

संवाददाता, तानाजी केदारी, महाराष्ट्र राज्य प्रमुख,
दिनांक, २५-५-२०२१.
(दि.२४ मे) : प्रत्येक घरात या ना त्या कारणाने भांडण होत असतात. त्यासोबतच सासू-सुनेचं भांडण हे सुद्धा आपल्याला अनेकवेळा पाहायला मिळतं. मात्र पुण्यात सासू- सूनेच्या भांडणात सूनेने आपल्या सासूचा गळा आवळून खुन केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

पुण्यातील मावळ तालुक्यात तळेगाव शहरमधील टेल्को हाऊसिंग सोसायटीमध्ये ही घटना घडली आहे. या प्रकरणी सून पूजा शिंदे आणि तिचा पती मिलिंद शिंदेला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी मयत सासू बेबी शिंदे आणि सून पूजा शिंदे यांच्यात कडाक्याचं भांडण झालं. या भांडणात पूजा शिंदेला राग अनावर न झाल्याने तिने ब्लाउजच्या साहाय्याने आपल्या सासूचा गळा आवळला. यामध्ये बेबी शिंदे यांचा मृत्यू झाला
ब्लाउजने गळा आवळल्यामुळे बेबी शिंदे निपचित पडून राहिल्या. त्यानंतर सूनेने आपला पती मिलिंद शिंदेला याबाबत सांगितलं. दोघांनी संगणमत करून मरण पावलेल्या बेबी शिंदेंचा मृतदेह एका प्लॅस्टिकच्या पोत्यात भरला आणि कोणालाही संशय येऊ नये म्हणून घराच्या छतावर ठेवला मात्र दोन दिवसांनंतर वास येऊ लागल्यामुळे आपण केलेला गुन्हा उघडकीस येणार या भीतीने दोघांनी मिळून मृतदेह पोत्यात भरून जवळच्याच एका झाडाझुडपात फेकून दिला.

दरम्यान, पोत्यात भरलेल्या मृतदेहाचा वास येऊ लागल्याने रहिवाशांनी तळेगाव पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी सूनेला चौकशीसाठी ताब्यात घेतलं. चौकशीच्या सुरूवातीला पूजाने उडवाउडवीची उत्तरे दिलीत मात्र त्यानंतर तिने आपल्या सासूच्या त्रासाला आणि छळाला कंटाळून गळा आवळून खून केल्याची कबुली दिली. आपल्या आईच्या खुनात मुलाचाही हात असल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

Aslam Khan

हर बड़े सफर की शुरुआत छोटे कदम से होती है। 14 फरवरी 2004 को शुरू हुआ श्रेष्ठ भारतीय टाइम्स का सफर लगातार जारी है। हम सफलता से ज्यादा सार्थकता में विश्वास करते हैं। दिनकर ने लिखा था-'जो तटस्थ हैं समय लिखेगा उनका भी अपराध।' कबीर ने सिखाया - 'न काहू से दोस्ती, न काहू से बैर'। इन्हें ही मूलमंत्र मानते हुए हम अपने समय में हस्तक्षेप करते हैं। सच कहने के खतरे हम उठाते हैं। उत्तरप्रदेश से लेकर दिल्ली तक में निजाम बदले मगर हमारी नीयत और सोच नहीं। हम देश, प्रदेश और दुनिया के अंतिम जन जो वंचित, उपेक्षित और शोषित है, उसकी आवाज बनने में ही अपनी सार्थकता समझते हैं। दरअसल हम सत्ता नहीं सच के साथ हैं वह सच किसी के खिलाफ ही क्यों न हो ? ✍असलम खान मुख्य संपादक

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button