पोलिसांचा असाही चेहरा … पुणे शहर पोलिसांच्या १९९५ च्या बॅचचे व्हाट्सएप ग्रुपच्या माध्यमातून देशसेवा करत अनोखे सेवाकार्य

संवाददाता, सौ पार्वती ढोणे, महाराष्ट्र राज्य प्रभारी.
दिनांक,४-६-२०२१. कधीकधी अशी काही छायाचित्रे सोशल मीडियावर समोर येतात ज्यांना पाहून आपले मन आनंदित होते आणि आपल्याला वाटतं की अजून तरी माणुसकी जिवंत आहे. अशीच काही छायाचित्रे आहेत जी आपल्याला माणुसकीची शिकवण देतात त्यातीलच एक पुणे शहर पोलीस १९९५ बॅच …
या बॅच मधील ‘नरेंद्र राजे’ पोलीस हवालदार, हे सध्या चिखली पोलीस स्टेशन येथे कार्यरत आहेत. पिंपरी चिंचवड आयुक्तालय मधील यांनी सन २०१५ मध्ये व्हाट्सएपचा ग्रुप तयार केला व ते आज तो पर्यत बॅचच्या सहकार्यातुन विविध उपक्रम म्हणजे , त्यांचे बॅच मधील कोण बॅचमेट मयत झाल्यास , त्यांचे कुटुंबियांना आर्थिक मदत केली जाते , एखादा बॅचमेटला जर एखादा मोठा आजार झाला तर हे त्यास आर्थिक मदत करतात. त्यातुन मागील वेळी कोल्हापुर येथे महापुर आला तेव्हा नाना पाटेकर, यांचे संस्थेस बॅच तर्फे एक लाखाचा धनादेश देण्यात आला आहे.