सुभाष माछरे यांची बांधकाम कामगार सेनेच्या प्रदेश कार्याध्यक्ष पदी निवड

पिंपरी (प्रतिनिधी) दि.२१- *पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे निवृत्त सहाय्यक आयुक्त तथा झोपडपट्टी निर्मुलन व पुनर्वसन विभागाचे सक्षम अधिकारी सुभाष माछरे यांची बांधकाम कामगार सेनेच्या प्रदेश “कार्याध्यक्ष” पदी नियुक्ति करण्यात आली.
यावेळी सुभाष माछरे म्हणाले की, “बांधकाम कामगार सेनेचे कार्य पाहता असंघटित क्षेत्रातील कामगारांना योग्य न्याय देण्यात ही संघटना नेहमी क्रियाशील असते, या असंघटित कामगारांच्या पाठीशी ठामपणे राहुन त्यांना शासकीय योजना व सुरक्षा, आरोग्य याचा लाभ मिळवून देत असल्यामुळे मी नेहमीच प्रभावित होतो, आता निवृत्त झाल्यामुळे व समाजकार्य करण्याची इच्छा असल्यामुळे बांधकाम कामगार सेनेत काम करण्याचा निर्णय घेतला आहे”.
बांधकाम कामगार सेनेचे संस्थापक अध्यक्ष जयंत शिंदे यांच्या हस्ते माछरे यांना नियुक्तिपत्र देण्यात आले, यावेळी सेनेचे कायदेविषयक सल्लागार अॅड.शिवाजीराव साळोखे, उपाध्यक्ष किशोर हातागळे, सरचिटणीस सचिन गुंजाळ, शहराध्यक्ष गंगाधर कांबळे, उज्वला गर्जे, नोसी खान आदी प्रमुख पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.