मराठी

दृढ निश्चय, अनुशासन आणि प्रामाणिक कष्ट विद्यार्थ्यांसाठी यशाची त्रिसुत्री -महामहिम राज्यपाल श्री. भगत सिंह कोश्यारी

अहमदनगर प्रतिनिधी/ विलास गिर्‍हे
भारत हा कृषि प्रधान देश असून हा देश शेतकर्यांचा आणि कृषि पदवीधरांचा आहे. कृषि पदवीधरांनी शपथ घेतली पाहिजे की आम्ही शेती करु, शेती पुरक उद्योग उभारुन कृषि उद्योजक होऊ आणि रोजगार निर्मिती करु. देशासाठी असे काम करा की आपले उदाहरण इतर लोक देतील. कृषि पदवीधरांनी दृढ निश्चय, अनुशासन आणि प्रामाणिक कष्ट या त्रिसुत्रीचा अवलंब केला तर यश निश्चित मिळेल असे प्रतिपादन राज्याचे महामहिम राज्यपाल श्री. भगत सिंह कोश्यारी यांनी केले.
महात्मा फुले कृषि विद्यापीठाच्या चौतीसाव्या पदवीप्रदान समारंभात स्नातकांना उदद्ेशून दीक्षांत भाषण करतांना ते बोलत होते. या समारंभाच्या अध्यक्षस्थानी महामहिम राज्यपाल, महाराष्ट्र राज्य आणि कुलपती, महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी मा. श्री. भगत सिंह कोश्यारी उपस्थित होते. यावेळी व्यासपीठावर कुलगुरू डॉ. के. पी. विश्वनाथा, अधिष्ठाता (कृषि) डॉ. अशोक फरांदे, कुलसचिव सोपान कासार, कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. दिलिप पवार याचबरोबर महाराष्ट्र कृषी शिक्षण आणि संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष श्री हरिभाऊ जावळे,विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे सदस्य आ. श्री. प्रकाश गजभिये, श्री. तुषार पवार, श्री. नाथाजी चौगुले, सौ. सुनिता पाटील, डॉ. पंकजकुमार महाले, श्री दत्तात्रय पानसरे, सौ कीर्ती जमधाडे, संशोधन संचालक तथा विस्तार शिक्षण संचालक डॉ. शरद गडाख आणि विद्या शाखेचे उपकुलसचिव श्री. पी.टी. सुर्यवंशी उपस्थित होते.
राज्यपाल पुढे म्हणाले की, आपल्या भारताचा इतिहास हा खुप समृध्द आहे. भारतातील छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, स्वामी विवेकानंद यांनी जगात भारताचा गौरव वाढविला. आज सर्व जग भारताकडे आशेने बघत आहे. योगाची संकल्पना ही भारताने संपुर्ण जगाला दिलेली अमुल्य अशी भेट आहे. गौरवशाली परंपरा असलेल्या आपल्या भारत देशाला अजुन पुढे न्यायचे असेल तर आपल्या सर्वांना नाविन्यपुर्ण असे संशोधन करावे लागेल.
राज्याचे राज्यपाल आणि कृषि विद्यापीठाचे कुलपती मा. श्री. भगत सिंह कोश्यारी यांच्या शुभहस्ते पदव्या प्रदान करण्यात आल्या. यामध्ये 52 विद्यार्थ्यांना पीएच. डी., 308 विद्यार्थ्यांना पदव्युत्तर पदवी व 4707 विद्यार्थ्यांना पदवी असे एकुण 5067 पदव्या प्रदान करण्यात आल्या. मा. राज्यपाल श्री. भगत सिंह कोश्यारी यांचे शुभहस्ते सन 2018-19 मध्ये बी.एस्स.सी (कृषि) पदवीत प्रथम आलेली कु. मोहीनी अशोक जगताप, बी.एस्स.सी (उद्यान विद्या) मध्ये प्रथम आलेली कु. गायत्री पांडुरंग चव्हाण, कृषि अभियांत्रिकीमध्ये प्रथम आलेला अभिजीत राजेंद्र जाधव यांना सुवर्णपदक व इतर यशस्वी विद्यार्थ्यांना पदके प्रदान करण्यात आली.
यावेळी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. के. पी. विश्वनाथा यांनी विद्यापीठाचा कृषि शिक्षण, संशोधन व विस्तार शिक्षणाचा अहवाल सादर केला. कुलगुरू डॉ. विश्वनाथा म्हणाले विद्यापीठ विविध विषयांमध्ये पदविका, कृषि पदवी, पद्व्युत्तर आणि आचार्य पदव्यांमध्ये विद्यार्थ्यांना शिक्षण देते. यावर्षी विद्यापीठाने विविध पिकांचे आठ वाण, एक कृषि यंत्र व औजारे आणि एकूण 47 तंत्रज्ञान शिफारशी विकसित करुन शेतकर्यांसाठी प्रसारीत केलेल्या आहेत. विद्यापीठाने आत्तापर्यंत विविध पिकांचे 263 वाण, 36 कृषि यंत्रे व अवजारे आणि 1518 तंत्रज्ञान शिफारशी शेतकर्यांना दिल्या आहेत. राष्ट्रीय कृषि उच्च शिक्षण प्रकल्पांतर्गत भारतीय कृषि अनुसंधान परिषद, नवी दिल्ली यांनी अद्ययावत कृषि हवामान व जल व्यवस्थापन हा रु. 19.90 कोटीचा प्रकल्प सन 2017-18 ते 2020-21 या कालावधीकरीता मंजुर केलेला असून त्या अंतर्गत पदव्युत्तर आचार्य पदवी तसेच पदवीका अभ्यासक्रम लवकरच सुरु करण्यात येणार आहेत. सन 2022 पर्यंत शेतकर्यांचे उत्पन्न दुप्पट करणे या केंद्र शासनाच्या महत्वकांक्षी योजनेच्या अनुषंगाने विद्यापीठात विविध कार्यक्रम सुरु केलेले आहेत. विस्तार शिक्षण क्षेत्रात देखिल विद्यापीठाने नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले आहेत.
सकाळच्या सत्रात महामहिम राज्यपालांनी कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्रातील प्रदर्शनाला भेट दिली. समारंभाला विद्यापीठाचे विद्या परिषदेचे सदस्य, माजी कुलगुरू डॉ किसनराव लवांडे, डॉ व्यंकट मायंदे,अप्पर पोलीस अधिक्षक श्री सागर पाटील,कृषि संचालक कैलास मोते, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री शिवाजीराव जगताप,नियंत्रक विजय कोते, विद्यापीठ अभियंता मिलिंद ढोके, कृषिभूषण श्री सुरसिंग पवार,मान्यवर, पत्रकार, सहयोगी अधिष्ठाता, विभाग प्रमुख, अधिकारी, शास्त्रज्ञ, प्रगतीशील शेतकरी, विद्यार्थी व विद्यार्थीनी मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. बापुसाहेब भाकरे आणि डॉ. आनंद सोळंके यांनी केले.

Aslam Khan

हर बड़े सफर की शुरुआत छोटे कदम से होती है। 14 फरवरी 2004 को शुरू हुआ श्रेष्ठ भारतीय टाइम्स का सफर लगातार जारी है। हम सफलता से ज्यादा सार्थकता में विश्वास करते हैं। दिनकर ने लिखा था-'जो तटस्थ हैं समय लिखेगा उनका भी अपराध।' कबीर ने सिखाया - 'न काहू से दोस्ती, न काहू से बैर'। इन्हें ही मूलमंत्र मानते हुए हम अपने समय में हस्तक्षेप करते हैं। सच कहने के खतरे हम उठाते हैं। उत्तरप्रदेश से लेकर दिल्ली तक में निजाम बदले मगर हमारी नीयत और सोच नहीं। हम देश, प्रदेश और दुनिया के अंतिम जन जो वंचित, उपेक्षित और शोषित है, उसकी आवाज बनने में ही अपनी सार्थकता समझते हैं। दरअसल हम सत्ता नहीं सच के साथ हैं वह सच किसी के खिलाफ ही क्यों न हो ? ✍असलम खान मुख्य संपादक

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button