पारनेर तालुक्यातील जातेगाव, घाणेगाव आणि गटेवाडी या गावच्या शॆतक-यांची पिळवणुक थांबवा

रामदास ढोरमले
प्रभारी महाराष्ट्र राज्य
पारनेर तालुक्यातील जातेगाव, घाणेगाव आणि गटेवाडी या गावच्या शॆतक-यांची पिळवणुक थांबवा!
जातेगाव,घाणेगाव व गटेवाडी या गावातील शेतक-यांची आज तीन दिवसापासुन महावितरण कंपनीकडुन पिळवणुक चालु आहे. शेतीपंपासाठी लागणारी विज थकीत विजबिलाच्या कारणावरुन संपूर्णपणे खंडित केलेली आहे. विजबिल भरा अन्यथा विज कायमस्वरुपी खंडीत करणार अशा स्वरुपातील धमक्या शेतक-यांना दिल्या जात आहे त्यामुळे शेतकरी हवालदील झाले आहेत.हाताशी आलेले पिक वाया जाणार या चिंतेने शेतकरीवर्ग चिंतातुर झाला आहे. कुठच्याही प्रकारचे व्यवस्थापन नसलेली महावितरण कंपनी अशा स्वरुपाची पिळवणुक करत आहे आणि याकडे सर्वच राजकीय पक्षांनी डोळेझाक केलेली दिसत आहे.
खरंतर शेतकरी विजबील नियमित भरण्यास तयार आहेत. परंतु महावितरण कंपनीकडुन नियमीत विज आणि विजरोहित्राची देखभाल विना लोडशेडींग नियमीत वीज आणि वापरलेल्या विजेचे वीजबील शेतक-यांना मिळावीत अशी माफक अपेक्षा शेतक-यांची आहे. याबाबत राज्यामधुन सर्वच शेतकरी वर्गाची मागणी आहे शासनाने याबाबत विचार करुनच शेतक-यांना या त्रासातुन मुक्त करण्याचा विचार करावा व शेतक-यांची पिळवणुक थांबवावी!