चोरलेली कार विक्रीची जाहिरात ‘ओएलएक्स’वर; पोलिसांनी ताथवडे,(पुणे) येथे आरोपीस ठोकल्या बेड्या

संवाददाता, तानाजी केदारी, महाराष्ट्र राज्य प्रमुख,
दिनांक,१४.१०.२०२१.
चोरी केलेली आलिशान कार ‘ओएलएक्स’ वर विक्री करण्याचा प्रयत्न करणाऱ्या कर्नाटक येथील एका तरुणाला चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या गुंडा विरोधी पथकाने अटक केली. त्याच्याकडून ४४. लाख रुपये किमतीची कार जप्त करण्यात आली आहे. ही कारवाई मंगळवारी (दिनांक १२.) बेंगळुरू-मुंबई महामार्गावर ताथवडे, येथे करण्यात आली.
चेतन बसवराज म्हेत्रे (वय २६, रा. भातब्रा, ता. भालकी, जि. बिदर) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी म्हेत्रे याने कर्नाटकातील बेंगलोर येथून महागडी आलीशान कार चोरी केली. या वाहन चोरीप्रकरणी बेंगलोर येथील राममूर्तीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. आरोपी म्हेत्रे, याने ती कार विकण्याची जाहिरात चक्क ओएलएक्सवर दिली.