विशेष पोस्ट

चोरी केलेल्या१.कोटी ११.लाख हजाराचा मुद्देमाल हस्तगत,वाकड पोलिसांची कारवाई.* *चोरी केलेल्या१.कोटी ११.लाख हजाराचा मुद्देमाल हस्तगत,वाकड पोलिसांची कारवाई

संवाददाता तानाजी केदारी महाराष्ट्र राज्य प्रमुख.
दिनांक,१२-१०-२०२०.
चोरी केलेल्या१.कोटी ११.लाख हजाराचा मुद्देमाल हस्तगत,वाकड पोलिसांची कारववाई

*पोलिसांवर गोळीबार केलेल्या आरोपीस वाकड पोलिसांकडून अटक*

पोलिसांवर फायरिंग केलेल्या व दरोडा,जबरी चोरी,खून इत्यादी पंधरा गंभीर गुन्हयात अनेक वर्षापासून फरार असलेल्या अट्टल गुन्हेगारास वाकड पोलिसांना पकडण्यात यश आले आहे.

सविस्तर वृत्त असे कि, वाकड रोड येथील पीआर ज्वेलर्स, निगडी येथील नवकार ज्वेलर्स व पिंपरी येथील दुर्गा ज्वेलर्स येथून दुकाने फोडून सोन्याचे व चांदीचे दागिने चोरीस गेलेल्या घटना घडल्या होत्या. या घटना विषयी संबंधीत पोलीस ठाण्यामध्ये गुन्हे दाखल होते. या गुन्ह्यातील आरोपींना पकडण्याचे पोलिसांसमोर एक आव्हान होते. वाकड पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विवेक मुगळीकर यांच्या नेतृत्वाखाली आरोपीच्या तपासासाठी दोन विषेश पथके निर्माण केली होती. पोलीस तपास करत असताना विकीसिंग जालिंदरसिंग कल्याणी व त्यांची टोळी आरोपी असल्याचा दाट संशय निर्माण झाला होता. त्या अनुषंगाने तयार केलेल्या रणनीतीनुसार वाकड पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हरिष माने, पोलीस उपनिरीक्षक सिद्धनाथ बाबर तसेच तपास पथकाचे कर्मचारी यांनी खराडी,चंदननगर ,वाघोली भागात तळ ठोकून दहा दिवस माहिती घेतली असता पथकाचे कर्मचारी पोलीस नाईक प्रमोद कदम, यांना माहिती मिळाली आरोपी व्हर्ना कारमधून फिरत आहेत. त्यावरून सापळा लावून त्यास पोलिस पथकांनी आरोपी नामे विकीसिंग कल्याणी व विजयसिंग अंधासिंग जुन्नी उर्फ शिकलकर यांना मोठ्या शिताफीने पकडून त्यांच्या गाडीची पाहणी केली असता विकीसिंग कल्याण यांच्याकडे एक गावठी लोखंडी पिस्तल त्यामध्ये पाच काडतुसे व्हर्ना कारच्या डिकी मध्ये दोन मोठ्या आकाराच्या लोखंडी कटावण्या असे अनेक साहित्य मिळुन आले. त्यांची १२. दिवसांची पोलिस कस्टडी रिमांड मंजूर करून त्यांच्याकडे कौशल्यपूर्ण तपास केला असता त्यांच्यावर विविध पोलिस ठाण्यांमध्ये ३४.गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले. तसेच आरोपी यांच्याकडून दाखल असलेल्या गुन्ह्यातील एकूण मिळून एक कोटी अकरा लाख सदतीस हजार रुपयांचा मुद्देमाल त्यामध्ये ७५० ग्रॅम सोन्याचे दागिने, शंभर किलो चांदीचे दागिने, व्हर्ना कार, दोन ईको कार, एक गावठी पिस्तूल, पाच काडतुसे, कटावण्या व गुन्ह्यातील वापरत असलेले इतर हत्यारे असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. अशी माहिती पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी दिली आहे.

Aslam Khan

हर बड़े सफर की शुरुआत छोटे कदम से होती है। 14 फरवरी 2004 को शुरू हुआ श्रेष्ठ भारतीय टाइम्स का सफर लगातार जारी है। हम सफलता से ज्यादा सार्थकता में विश्वास करते हैं। दिनकर ने लिखा था-'जो तटस्थ हैं समय लिखेगा उनका भी अपराध।' कबीर ने सिखाया - 'न काहू से दोस्ती, न काहू से बैर'। इन्हें ही मूलमंत्र मानते हुए हम अपने समय में हस्तक्षेप करते हैं। सच कहने के खतरे हम उठाते हैं। उत्तरप्रदेश से लेकर दिल्ली तक में निजाम बदले मगर हमारी नीयत और सोच नहीं। हम देश, प्रदेश और दुनिया के अंतिम जन जो वंचित, उपेक्षित और शोषित है, उसकी आवाज बनने में ही अपनी सार्थकता समझते हैं। दरअसल हम सत्ता नहीं सच के साथ हैं वह सच किसी के खिलाफ ही क्यों न हो ? ✍असलम खान मुख्य संपादक

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button