मराठी
नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्यासाठी जि.प.सदस्य अतुल देशमुख, यांच्याकडून तहसील विभागाला निवेदन

संवाददाता, तानाजी केदारी, महाराष्ट्र राज्य प्रमुख.
दिनांक,२३-७-२०२१.
बुधवार दि.२१. रोजी राञी मुसळधार पावसामुळे खेड तालुक्याच्या पश्चिम भागात भोरगिरी ते डेहणे परिसरातील अनेक गावात भात शेतीचे बांध वाहून गेले तर नवीनच आवणी केलेली भात रोपे गाडली गेली आहेत.नायफड येथे माती बंधारा फुटला असून जावळेवाडी मंदोशी येथील चार वर्षापुर्वी बांधलेला पुल वाहून गेला आहे.या भागातील नुकसानीचे पंचनामे तातडीने करावे यासाठी जिल्हा परिषद सदस्य अतुल देशमुख यांनी तहसील विभागाला निवेदन दिले आहे.