राज्य* *सरकारचा मोठा निर्णय; येत्या ७. ऑक्टोबरपासून राज्यातील सर्व मंदिरे उघडणार

संवाददाता,सौ.पार्वती ढोणे, महाराष्ट्र राज्य प्रभारी.
दिनांक,२६.९.२०२१. नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून म्हणजे ७. ऑक्टोबर पासून राज्यातील सर्वधर्मियांची प्रार्थना स्थळे आरोग्याचे नियम पाळून भक्तांसाठी खुली करण्याचा निर्णय मुख्यमंत्री मा.
उद्धव ठाकरे, यांनी घेतला आहे. त्यामुळे भाविक-भक्तांसाठी आनंदाची वार्ता समोर आली आहे.
नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून म्हणजेच ७
ऑक्टोबर राज्यातील सर्वधर्मीय प्रार्थनास्थळे खुली करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला आहे. सोबतच कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे व काळजी घेण्याचे आवाहन देखील त्यांनी नागरिकांना केले आहे.
मंदिर उघडण्याच्या निर्णयावर मुख्यमंत्र्यांनी प्रतिक्रिया देत म्हटले आहे कि, “दुसऱ्या लाटेचा सामना केल्यांनतर, आता कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेशी लढण्याचे आपण नियोजन केले आहे केले आहे. मात्र, सावकाशपणे सर्व बाबींची काळजी घेऊन बऱ्यापैकी निर्बंधात आपण शिथिलता आणली आहे. सध्या कोरोना रुग्णांच्या संख्येत घट झाली, असली तरीदेखील, आपण सावधगिरी बाळगणे आत्यंतिक आवश्यक आहे. धार्मिक स्थळे भक्तांसाठी खुली करण्यात आली असली तरी त्याठिकाणी आरोग्याच्या नियमांचे पालन होणे आवश्यक आहे.. चेहऱ्यावर मास्क, सुरक्षित अंतर, सॅनिटायझरचा वापर हा झालाच पाहिजे. धार्मिक स्थळांच्या व्यवस्थापन समितीची यामध्ये मोठी जबाबदारी असणार आहे. त्यांनी हे विसरू नये.