मान्सूनपूर्वची खबरदारी घेऊन पुणे शहरातील नागरिकांची गैरसोय टाळण्याची ‘सोनाली शितोळे’ यांची मागणी … महापौरांना दिले निवेदन*

संवाददाता, तानाजी केदारी, महाराष्ट्र राज्य प्रमुख,
दिनांक, २०-५-२०२१.
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात विविध कामे मार्गी लावण्यात यावीत याकरिता ‘सोनाली शितोळे’ (भोसले) प्रसिद्धी प्रमुख पुणे शहर महिला आघाडी यांनी महापौर मुरलीधर मोहळ, यांना निवेदन दिले.
या निवेदनात सोनाली शितोळे, यांनी म्हटले आहे की, ‘शहरामध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग चालू आहे. कोरोना बाधित रुग्ण शहरातील वेगवेगळ्या भागात सापडत आहेत. या अनुषंगाने पूर्ण देशभरात ३१.मे पर्यंत संचारबंदी (लॉक डाऊन) लागू करण्यात आली आहे. कोरोनाच्या विरोधात मनपा युध्दपातळीवर प्रयत्न करत आहे, शहरात नागरीकांचे सर्वेक्षण करणे, बेघर,बेरोजगार नागरीकांना जेवण पुरविणे नागरीकांमध्ये कोरोना विरोधात जनजागृती करणे इत्यादी प्रयत्न करीत आहे
परंतु आता पावसाळा तोडावर आलेला आहे, पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर दरवर्षी नियमित शहरात होणारी विविध कामे प्रलंबित आहेत. उदा. शहरातील छोटे मोठे नाले साफसफाई करणे, शहरातील रस्ते खाजगी कंपनींच्या केबल्स टाकण्यासाठी खोदाई करण्यात आलेली आहे, त्यामुळे त्या रस्त्यांची दुरुस्ती करण्यात आलेली नाही. त्यामुळे त्या रस्त्यांचे डांबरीकरण करणे गरजेचे आहे. त्याच प्रमाणे ठिकठिकाणी कच-यांचे ढीग ठिकठिकाणी साठलेले आहेत, ते पावसाळा सुरु होण्यापूर्वी हटविणे गरजेचे आहे.