मराठी

पिंपरी-चिंचवड आणि पुण्यातील गोरगरीब कोरोना रुग्णांना असेच मरू द्यायचे का

संवाददाता, सौ. पार्वती ढोणे, महाराष्ट्र राज्य प्रभारी.
दिनांक, २०-४-२०२१.
आमदार लक्ष्मण जगताप यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे यासाठी व्यक्त केला संताप गोरगरीब कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी पिंपरी-चिंचवड आणि पुण्यातील सर्व धर्मादाय रुग्णालयांमध्ये महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना लागू करण्यात यावी म्हणून चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार व भाजपचे माजी शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप गेल्या वर्षभरापासून सरकारकडे पत्रव्यवहार करत आहेत. पण सरकारच्या पातळीवर गोरगरीब कोरोना रुग्णांचा सहानुभीतीने विचार केला जात नसल्याने संतापलेल्या आमदार लक्ष्मण जगताप यांनी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना खरमरीत शब्दांत पत्र लिहिले आहे. गोरगरीब कोरोना रुग्णांनी उपचार घ्यायचे नाहीत का?, की त्यांना केवळ आश्वासने देऊन असेच मरू द्यायचे आहे?, अशा शब्दांत आमदार लक्ष्मण जगताप यांनी पत्रातून आपला संताप व्यक्त केला आहे.

यासंदर्भात आमदार लक्ष्मण जगताप यांनी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे, “पिंपरी-चिंचवड आणि पुणे या दोन्ही शहरात कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळत आहे. शासकीय रुग्णालयांमध्ये दाखल होणाऱ्या गोरगरीब कोरोना रुग्णांना आयसीयू, ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर बेड तसेच रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध होत नाही. दरम्यान, गेल्या वर्षी २१ मे २०२० रोजी राज्य सरकारने सर्व धर्मादाय व खासगी रुग्णालयांनी ८० टक्के बेड कोरोना रुग्णांसाठी राखीव ठेवावेत, असा आदेश काढलेला आहे. परंतु, या रुग्णालयांमध्ये दाखल होणाऱ्या गोरगरीब कोरोना रुग्णांना तेथील उपचाराचा खर्च परवडणारा नाही. या रुग्णालयांमध्ये दाखल रुग्णांकडून कशा प्रकारे आर्थिक लूट केली जाते, याच्या अनेक तक्रारी सर्व लोकप्रतिनिधींकडे प्राप्त होत आहेत. शासकीय पातळीवरून अशा रुग्णालयांवर कारवाईचे केवळ आश्वासन दिले जाते. होत मात्र काहीच नाही. लूट झालेल्या रुग्णांच्या हाती काहीच पडत नाही. त्यामुळे अशा रुग्णालयांमध्ये उपचारांसाठी येणाऱ्या गोरगरीब रुग्णांचे आतोनात हाल होत आहेत.
दरम्यान, पिंपरी-चिंचवड आणि पुणे या दोन्ही शहरात गेल्या दोन महिन्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली आहे. या रुग्णांना सिटीस्कॅन, एक्सरे तसेच एचआरसीटी टेस्टसाठी खासगी प्रयोगशाळांमध्ये पाठविले जाते. तेथेही समान्य रुग्णांची लूट होत आहे. त्यामुळे जसे कोरोना टेस्टसाठी राज्य सरकारने दर निश्चित केले आहेत, त्याच धर्तीवर सिटीस्कॅन, एक्सरे तसेच एचआरसीटी टेस्टसाठी दर निश्चित करून सामान्यांना दिलासा द्यावा, अशी मागणीही आमदार लक्ष्मण जगताप यांनी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे केली आहे

Aslam Khan

हर बड़े सफर की शुरुआत छोटे कदम से होती है। 14 फरवरी 2004 को शुरू हुआ श्रेष्ठ भारतीय टाइम्स का सफर लगातार जारी है। हम सफलता से ज्यादा सार्थकता में विश्वास करते हैं। दिनकर ने लिखा था-'जो तटस्थ हैं समय लिखेगा उनका भी अपराध।' कबीर ने सिखाया - 'न काहू से दोस्ती, न काहू से बैर'। इन्हें ही मूलमंत्र मानते हुए हम अपने समय में हस्तक्षेप करते हैं। सच कहने के खतरे हम उठाते हैं। उत्तरप्रदेश से लेकर दिल्ली तक में निजाम बदले मगर हमारी नीयत और सोच नहीं। हम देश, प्रदेश और दुनिया के अंतिम जन जो वंचित, उपेक्षित और शोषित है, उसकी आवाज बनने में ही अपनी सार्थकता समझते हैं। दरअसल हम सत्ता नहीं सच के साथ हैं वह सच किसी के खिलाफ ही क्यों न हो ? ✍असलम खान मुख्य संपादक

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button