सीरम इन्स्टिट्यूट पुणे महापालिकेला लस देण्यास तयार … तर मग काय आहे, अडचण

संवाददाता, तानाजी केदारी, महाराष्ट्र राज्य प्रमुख,
दिनांक, २-६-२०२१.
राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारांकडून लसीकरणावर भर दिला जात आहे. अशावेळी पुणे महापालिकेनं सीरम इन्स्टिट्यूटकडे लसीच्या पुरवठ्याची मागणी केलीय. सीरमकडूनही पुणे महापालिकेच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देण्यात आलाय. मात्र, केंद्र सरकारच्या परवानगीशिवाय पुणे महापालिकेला लस मिळू शकणार नाही. अशावेळी केंद्र सरकारची परवानगी का मिळत नाही? असा प्रश्न विचारला जातोय …
सीरम इन्स्टिट्यूटने पुणे महापालिकेला लस देण्याची तयारी दर्शवली आहे. मात्र, लसीसाठी पुणे महापालिकेला केंद्र सरकारकडून आवश्यक परवानगी घ्यावी लागणार आहे. तसं पत्र सीरम इन्स्टिट्यूटकडून पुणे महापालिकेला देण्यात आलंय. सीरम इन्स्टिट्यूटकडून लस मिळावी यासाठी पुणे महापालिका गेल्या 3 आठवड्यापासून पाठपुरावा करत आहे. अशावेळी सीरमने परवानगी दिली आहे. पण केंद्र सरकार परवानगी देणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.