तांदूळ घोटाळ्याचे धागेदोरे वरपर्यंत … फडणवीसांचा गंभीर आरोप

संवाददाता,तानाजी केदारी,महाराष्ट्र राज्य प्रमुख.
दिनांक,१४-७-२०२१.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा रेशनवरील तांदूळ घोटाळ्यासंदर्भात गंभीर आरोप केले आहेत. तांदूळ घोटाळ्याचे धागेदोरे वरपर्यंत गेले असून याची व्याप्ती पूर्व विदर्भातील भंडारा, गोंदिया, चंद्रपूर जिल्ह्यापर्यंत गेली असल्याचा दावा फडणवीस यांनी केला आहे. दरम्यान, फडणवीस यांच्या आरोपानंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकार काय निर्णय घेतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
पूर्व विदर्भात पंतप्रधान जनकल्याण योजनेद्वारे मिळाणाऱ्या तांदळात घोटाळा झाल्याचे आरोप होत आहेत. या घोटाळ्याचे धागेदोरे खूप लांबपर्यंत गेले आहेत, असा दावा देखील फडणवीस यांनी केला आहे. तसंच, या तांदूळ घोटाळ्याची अद्याप चौकशी झाली नसल्यानं शंका वाढल्याचंही फडणवीस यांनी म्हटलं आहे.
जर या घोटाळ्याची चौकशी झाली तर अनेक बडे मासे अडकण्याची शक्यता आहे. त्यात अन्न पुरवठा अधिकारी आणि राईस मिलच्या मालकांचा समावेश असण्याचीही शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.